शहरं
Join us  
Trending Stories
1
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
2
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
3
इंदिरा गांधींचा निर्णय संविधानिक, ११ वर्षांपासून सुरू असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय?: सपकाळ
4
ना रोहित-विराटसारखी धमक; ना सिनियर्सला भिडण्याचं धाडस! गिलच्या कॅप्टन्सीवर दिग्गजाचे मोठं वक्तव्य
5
Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden?
6
आता वर्षातून दोनदा होणार दहावीच्या बोर्डाची परीक्षा; CBSE बोर्डाचा मोठा निर्णय
7
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...
8
“शक्तिपीठ महामार्गाला विरोध असणाऱ्यांनी सरकारमधून बाहेर पडून दाखवावे”; काँग्रेसचे आव्हान
9
Raja Raghuvanshi Murder: राजा रघुवंशी हत्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश; नाल्यात सापडला सोनमचा लॅपटॉप आणि पिस्तूल
10
तुमचा म्युच्युअल फंड तोट्यात आहे का? एका वर्षात १४ योजनांनी दिले निगेटिव्ह रिटर्न; अशा वेळी काय करावं?
11
पती ५०००० रुपयांचे कर्ज फेडू शकला नाही,पत्नीला विकलं; पण पुढे जे झालं ते ऐकून पोलीसही हैराण 
12
हिमाचलच्या कुल्लूमध्ये ढगफुटीसारखा पाऊस; मोठं नुकसान,पुरात घरे वाहून गेली, व्हिडीओ व्हायरल
13
“निवडणूक आयोगाने शहानिशा केली नाही, मतचोरीची उच्चस्तरीय चौकशी करा”; काँग्रेसची मागणी
14
Dharashiv: 'शक्तीपीठ'च्या जमीन मोजणीस विरोध; पोलिसांसोबत झटापटीत ६ शेतकरी जखमी
15
ICC Latest Test Rankings : रिषभ पंतला मिळालं मोठं बक्षीस! बुमराह-रुटचा दबदबा कायम
16
भारतासोबत PoK-दहशतवादावर चर्चा करण्यास तयार..; पाकिस्तानची 'या' देशाला मदतीची विनंती
17
गुरुवारी टेंबेस्वामी पुण्यतिथी: ‘दिगंबरा दिगंबरा..’ हा कालातीत मंत्र देणारे थोर दत्तोपासक
18
'पंचायत ४'वर चाहते नाराज, सीझनच्या शेवटच्या एपिसोडला मिळाली आतापर्यंतची सर्वात वाईट रेटिंग
19
नवी भविष्यवाणी: तिसरं महायुद्ध आत्ता नाही, तर 'या' साली होणार; विष्णूंच्या कल्की अवताराचीही चर्चा!
20
५२ आठवड्याच्या उच्चांकी स्तरावर ट्रेड करतोय 'हा' शेअर; "एक्सपोर्ट म्हणाले, खरेदी करा, भाव..." 

अणुभट्टी साफ करताना दोन कामगारांचा मृत्यू; श्वास गुदमरला; वाडा येथील कारखान्यात दुर्घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2022 12:00 IST

कंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री नसल्याने या कामगारांचा मृत्यू झाल्याचा आरोप

लोकमत न्यूज नेटवर्क वाडा (पालघर) : वाडा तालुक्यातील बिलोशी या गावच्या हद्दीत असलेल्या महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन या कारखान्यातील अणुभट्टीची साफसफाई करण्यासाठी टाकीमध्ये उतरलेल्या दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी रात्री घडली. दरम्यान, कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाईकांना नकार दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे. 

सचिन बाळकृष्ण भोईर (रा. बिलोशी, वाडा) व सचिन यशवंत करले (रा. गोऱ्हे, वाडा) अशी मृत्युमुखी पडलेल्या तरुण कामगारांची नावे आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, बिलोशी गावाच्या हद्दीत महिंद्रा रोझीन अँड टर्पेंटाईन हा रासायनिक कारखाना आहे. त्यात अणुभट्टी असून, ती साफ करण्यासाठी मंगळवारी रात्री एक कामगार उतरला होता. आतील रसायनाच्या वासामुळे तो गुदमरल्याने आरडाओरडा करू लागला. त्यानंतर त्याला वाचवण्यासाठी दुसरा कामगार भट्टीमध्ये उतरल्याने तोही गुदमरल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरणकंपनी प्रशासनाकडून कामगारांच्या सुरक्षेसाठी कोणतीही साधनसामग्री नसल्याने या कामगारांचा मृत्यू झाला असल्याचे सांगून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या कंपनी व्यवस्थापनाची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे. हा अपघात कंपनीच्या हलगर्जीपणामुळे झाल्याने कामगारांना प्रत्येकी दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्याची मागणी मृतांच्या नातेवाईकांनी करत मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्याने येथील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

भरपाईची मागणी       दरम्यान, वाडा तहसीलदार कार्यालयात कंपनीचे मालक व मृतांचे नातेवाईक यांच्यात चर्चा सुरू असून, कंपनी मालक चार लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यास तयार असल्याचे समजते. मात्र, नातेवाईकांनी प्रत्येकी दहा लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवा  या दुर्घटनेप्रकरणी वाडा पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, वाडा पोलिस अधिक तपास करत आहेत. कंपनीच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाल्याने मालकावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे सरचिटणीस विजय जाधव यांनी केली आहे.