शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
2
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
5
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
6
धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
7
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
8
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
9
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
10
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
11
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
12
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
13
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
14
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
15
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
16
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
17
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
18
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
19
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
20
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
Daily Top 2Weekly Top 5

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन दलाल महिलांना अटक; अल्पवयीन मुलीसह दोन पिडितांची सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: April 21, 2023 18:38 IST

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई: महातमा फुले चौक पोलिस ठाण्यात गुन्हा 

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : गरिब असहाय मुलींना फूस लावून त्यांच्याकडून शरीरविक्रयाचा व्यवसाय करणाºया दोन दलाल महिलांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने कल्याणमधून अटक केल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांनी शुक्रवारी दिली. एका अल्पवयीन मुलीसह दोन पिडित मुलींची त्यांच्या तावडीतून सुटका केली आहे.

ठाणे परिसरात पिडित असहाय्य मुलींना फूस लावून शरीरविक्रयासाठी पाठविले जात असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. त्याच आधारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रिती चव्हाण, जमादार डी. जे. भोसले, डी. व्ही. चव्हाण, डी. के. वालगुडे आणि हवालदार पी.ए. दिवाळे आदीच्या पथकाने २० एप्रिल रोजी कल्याण रेल्वे स्थानकाजवळ अनिल पॅलेस नंबर एक या हॉटेलमध्ये बोगस ग्राहक पाठवून छापा टाकला.

याच कारवाईमध्ये दोन दलाल महिलांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्या तावडीतून एका अल्पवयीन मुलीसह अन्य एका महिलेची सुटका करण्यात आली.  दोन आरोपी महिलांविरुद्ध महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यात लैंगिक अपराधापासून बालकांचे सरक्षण अधिनियम (पोक्सो) आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेट