शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

२१ एटीएम फोडणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2023 11:47 IST

पत्रा तोडून पळताना केली अटक

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बोरीवली पश्चिम परिसरात असलेल्या बासिन कॅथलिक  को ऑपरेटिव्ह बँकेत दोन अनोळखी व्यक्तींनी स्क्रू ड्रायव्हरने एटीएम मनी डिस्पेंस पट्टी तोडून त्यातील रोख चोरण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी बँकेच्या सहायक व्यवस्थापकांनी एमएचबी कॉलनी पोलिसात तक्रार दिल्यावर धीरेंद्रकुमार रामदेव पाल आणि अभिषेक रामअजोर यादव यांना बुधवारी अटक केली. त्यांनी आतापर्यंत २१ एटीएम फोडल्याची कबुली दिली आहे. पोलिसांना पाहून घराचा पत्रा तोडून ते पळण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांच्या मुसक्या आवळल्या.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुधीर कुडाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सचिन शिंदे , सहायक पोलिस निरीक्षक सूर्यकांत पवार, हवालदार शिंदे, खोत, नाईक देवकर, शिपाई सवळी शेरमाळे, मोरे आणि परिमंडळ ११ च्या शिपाई रुपाली डाईंगडे यांनी सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषण केले असता आरोपी चोरी करून उत्तर प्रदेशच्या प्रतापगडला जात असल्याचे तपास अधिकाऱ्यांना समजले. त्यानुसार त्यांच्यावर लक्ष ठेवल्यावर ठाण्याच्या जय भीमनगरमध्ये पत्र्याच्या झोपडीत ते लपल्याची माहिती मिळाली. त्यावेळी पवार यांच्या पथकाने त्यांच्या झोपडीस चारही बाजूने घेरले. ते पाहून आरोपीने घराचा पत्रा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्या मुसक्या आवळण्यात पवार यांच्या पथकाला यश आले. त्यांनी एमएचबी कॉलनीसह टिळक नगर, तुळींज, मीरा- भाईंदर, नालासोपारा, चेंबूर, डोंबिवली या ठिकाणी मिळून २१ एटीएम फोडल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

नेमकी घटना काय?

तक्रारदार जय फरगोज (३०) यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च रोजी संध्याकाळी त्यांच्या बोरीवली शाखेतील एटीएम सेंटरचा सुरक्षारक्षक सुभाष कुमार मातो याने एटीएममध्ये येणाऱ्या ग्राहकांना व्यवहार होण्यात अडथळा येत असल्याचे कळविले. त्यामुळे मशीनची देखभाल करणारे मंदार सावंत यांना बोलाविल्यावर मशीनमधील पट्टा कोणीतरी तोडून चोरी करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. 

टॅग्स :MumbaiमुंबईCrime Newsगुन्हेगारी