शहरं
Join us  
Trending Stories
1
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
2
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
3
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
4
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
5
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
6
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
7
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
8
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
9
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
10
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
11
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
12
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
13
हॉर्मुझबाबत इराणची नवी चाल, टोलवसुलीवर ठाम; अडवणुकीमुळे तणाव कायम,  सुप्रीम लीडर म्हणाले...
14
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
15
तो लय बेक्कार मारतो! Mukul Choudhary च्या वादळी खेळीनंतर Arjun Tendulkar चा 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
IPL 2026: कोलकाताच्या तोंडातून विजयी घास हिसकावला; मुकुल चौधरीची फलंदाजी पाहून ऋषभ पंत गेला भारावून!
17
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
18
KKR vs LSG: "जास्त विचार करू नको, फक्त मार...!" ऋषभ पंतचा तो एक सल्ला मुकुल चौधरीसाठी 'गुरुमंत्र' ठरला; ईडन गार्डन्स गाजवलं 
19
मध्य पूर्वेतील संकटकाळात भारताचा मॉरिशसला मदतीचा हात; तेल आणि वायूचा पुरवठा करणार
20
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

बारबाहेर तरुणाची शस्त्राने सपासप वार करून हत्या, दोन संशयितांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 21:02 IST

उल्हासनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देलपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली

उल्हासनगर -  धीरू बारमध्ये झालेल्या क्षुल्लक वादातून ७ ते ८ जणांच्या टोळक्याने मध्यरात्री अड्डीच वाजण्याच्या दरम्यान दीपक भोईर याचा बारसमोर धारदार शस्त्रांनी वार करून हत्या केली. याबाबत उल्हासनगरपोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे.

उल्हासनगर कॅम्प नं 3 नेहरू चौकात धीरूबार असून बारमध्ये दीपक भोईर मित्रासमावेत सोमवारी रात्री गेला होता. तेथे क्षुल्लक कारणावरून वाद झाल्यावर तो बारमधून बाहेर पडला. त्यावेळी लपून बसलेल्या 7 ते 8 जणांच्या टोळक्याने दिपकला मारण्यासाठी धारदार शस्त्रासह त्याच्या पाठीमागे धावले. जीव मुठीत घेऊन धावणारा दीपक खाली पडताच पाठलाग करणाऱ्या टोळक्यांनी त्याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिपकला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी नेले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. याप्रकाराने शहरासह दीपक भोईर राहत असलेल्या माणेरेगाव परिसरात खळबळ उडाली. मुख्य आरोपी नरेश उर्फ बबल्या याच्यासह सहकाऱ्यांना अटक होत नाही. तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा सुरवातीला कुटुंबासह नातेवाईकांनी घेतल्याने मोठा पेचप्रसंग उल्हासनगर पोलिसांसमोर उभा टाकला होता.

उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या उल्हासनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोन संशयितांना अटक केल्याची माहिती पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशील जावळे यांनी दिली. तसेच संशयीत आरोपीच्या मागे पोलीस पथक असल्याचे संकेत दिले. दरम्यान शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचे कारण पुढे करून शिवसेनेच्या नगरसेविका वसुधा बोडारे व ज्योत्स्ना जाधव यांनी महापालिका महासभेत शहर दारूबंदीचा ठराव आणला. सर्वपक्षीय नगरसेवकांनी सदर ठराव  बहुमताने मंजूर केल्यावर शहरातील गुन्हेगारी ऐरणीवर आली. तसेच गृहमंत्री यांना याबाबत निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. यासर्व प्रकारानंतर गुन्हेगारीची संख्या कमी झाली नाही. काही वर्षांपूर्वी धीरू बारबाहेर दोन गटातील वादातून कुकरेजा नावाच्या तरुणांची हत्या होऊन शिवसेनेच्या माजी नगरसेवकासह हत्येचा गुन्हा दाखल झाला होता. तसेच हाणामारीचे प्रकार येथे सुरूच असतात.शहरात गावठी दारु, अंमली पदार्थाची विक्री, हुक्का पार्लर आदींच्या अनैतिक धंद्याचा महापूर आला आहे. यातूनच गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे  बोलले जात आहे.  तसेच रात्रभर सुरू असणाऱ्या बार, डान्स बार, महिला बार, हुक्का पार्लर सुरू असल्याने गुन्हेगारी वाढल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय बोडारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

टॅग्स :Murderखूनulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसArrestअटक