शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे पार्टीत दोघांवर चाकूने वार, मैत्रिणीच्या भावाने केला हल्ला; वाशीतली घटना 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: August 15, 2023 23:14 IST

वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

नवी मुंबई : मध्यरात्रीच्या सुमारास वाशीत उघड्यावर सुरु असलेल्या बर्थडेच्या पार्टीत दोघांवर चाकूने वार झाल्याची घटना घडली आहे. बर्थडेसाठी आलेल्या एकावर त्याच्या मैत्रिणीच्या भावाने पाळत ठेवून हा हल्ला केला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे.वाशी येथील रघुलीला मॉल परिसरात सोमवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. घणसोली येथील शुभम सरवैया याचा वाढदिवस असल्याने काहीजण त्याठिकाणी जमले होते. त्यामध्ये तुर्भेत राहणारा निजामुद्दीन खान हा देखील आला होता. दरम्यान त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या दोघांनी त्याच्यावर चाकूने हल्ला केला. त्यामध्ये तो जखमी झाला असता रघुराव पै हा मदतीला धावला असता त्याच्यावर देखील दोघांनी वार करून पळ काढला होता. यामध्ये जखमी झालेल्या दोघांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांनी वाशी पोलिसांकडे तक्रार केली.

गुन्हा दाखल होताच वरिष्ठ निरीक्षक शशिकांत चांदेकर यांनी सहायक निरीक्षक पवन नांद्रे, उपनिरीक्षक निलेश बारसे आदींचे पथक केले होते. त्यांनी हल्ला करणाऱ्यांची माहिती मिळवून काही तासातच त्यांना कोपर खैरणे परिसरातून अटक केली. हसन सिद्दीकी व युसूफ शहा अशी हल्ला करणाऱ्यांची नावे आहेत. त्यांनी निजामुद्दीन याच्यावर पाळत ठेवून हा जीवघेणा हल्ला केला. यासाठी त्यांनी वापरलेले दोन चाकू व वापरलेली कार पोलिसांनी हस्तगत केली आहे. निजामुद्दीन याची बहिणीसोबत असलेली मैत्री त्यांना खटकत असल्याने त्यातुन त्यांनी हा हल्ला केला. याप्रकरणी वाशी पोलिस अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस