शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नालासोपाऱ्यात विजेचा शॉक लागून दोन चिमुकल्यांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 02:45 IST

बिलालपाडा येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन चिमुकल्या भावांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चोरट्या वीजेचा प्रवाह शिडीत उतरल्याने ही दुर्घटना घडली.

नालासोपारा - बिलालपाडा येथे घराजवळ खेळत असलेल्या दोन चिमुकल्या भावांचा वीजेचा शॉक लागून मृत्यू झाला. चोरट्या वीजेचा प्रवाह शिडीत उतरल्याने ही दुर्घटना घडली.हंसराज यादव चाळीत कैलास यादव हे पत्नी आणि तीन मुलांसह राहतात. सकाळी पियुष यादव आणि आयुष यादव हे घराबाहेर खेळत होते. जवळच एका बेकायेशीर चाळीचे काम सुरू होते. त्यांनी बेकायदेशीर वीज जोडणी घेतली होती. त्याचा विद्युत प्रवाह लोखंडी शिडीत उतरला होता. खेळताना आयुष याचा लोखंडी शिडीला हात लागला आणि तो खाली पडला. त्याला वाचवण्यासाठी आलेला पियुष पुढे सरसावला आणि त्यालाही विजेचा धक्का लागला. दोन्ही भावांना वसई विरार महापलिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याआधीच डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले.नालासोपारामध्ये मोठ्या प्रमाणात वीज चोरी केली जाते. बिलालपाडा येथीही आजूबाजूच्या परिसरात बसविण्यात आलेल्या विद्युत वाहक एका खांबाला मोठ्यासंख्येने विद्युत वाहक तारा जोडलेल्या असून त्यातून आजूबाजूच्या घरांना वीज जोÞडण्या देण्यात आल्या आहेत. परंतु वीज जोडण्या देत असताना विद्युत वाहक तारांचा विस्तार घरापर्यंत योग्य रित्या न केल्याने या तारा इमारती, झोपड्या, टेरेस, चाळी त्यावर त्यांचा गुंता तयार झाला आहे. काही ठिकाणी प्रवाहित तारा लोंबकळत असल्याने त्यातून विद्युत प्रवाह इतर बाबीत उतरत असतो. महावितरण अधीक्षक अभियंता दिनेश अग्रवाल यांनी सांगितले की, ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली त्याठिकाणी कोणत्याही प्रकारची वीज जोडणी दिलेली नव्हती. बेकायदा पद्धतीने वीज चोरी केली जात होती. त्याबाबत आम्ही कारवाई देखील करीत असतो. या परिसरातील वीज चोरींची पाहणी करून कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :Vasai Virarवसई विरार