शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात गोळीबाराच्या दोन घटनांमध्ये दोघे गंभीर जखमी, कारची काच फोडल्याचा जाब विचारल्याने नौपाड्यात गोळीबार

By जितेंद्र कालेकर | Updated: October 21, 2022 19:01 IST

Crime News: दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील या दोन्ही घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

- जितेंद्र कालेकर

ठाणे - बांधकाम व्यावसायिक बाबा माने यांच्या मोटारीची काच फोडल्याचा जाब विचारल्याने ओम साई प्रॉपर्टीजचा कर्मचारी  अश्विन गंगाराम गमरे (२६, रा. ठाणे) याच्यावर दोघांनी गोळीबार केल्याची नौपाडयात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास घडली. तर गणेश सुधाकर जाधव उर्फ काळा गण्या (३६, रा. लोकमान्यनगर, ठाणे.) याच्यावर लोकमान्यनगर भागात गोळीबार झाल्याची घटनाही गुरुवारी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास घडली. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ठाण्यातील या दोन्ही घटनांनी एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पहिल्या घटनेत २१ आॅक्टोंबर रोजी पहाटे ५ ते ५.१५ वाजण्याच्या सुमारास नौपाडयातील घंटाळी रोड भागातील ओम साई प्रॉपर्टीच्या कार्यालयासमोरील कुलकर्णी हाऊस येथे दोन अनोळखींनी बांधकाम व्यावसायिक बाबा माने यांच्या मोटारकारवर दगडफेक करीत तिचे नुकसान केले. त्यावेळी ओमसाई प्रॉपर्टीजच्या कार्यालयाबाहेर तेथील कर्मचारी अश्विन गमरे हे आकाश कंदिलाची तयारी करीत होते. दरम्यान, पोटभर हॉेटेलचे वेटरच्या निदर्शनास मोटारीची काच फोडल्याचा प्रकार निदर्शनास आला. त्यामुळे वेटर आणि काच फोडणाºयांमध्ये चांगलाच वाद झाला. त्यामुळे गमरे यांनीही या वादामध्ये उडी घेतली. त्यांनीही माने यांच्या गाडीची काच का फोडली? असा जाब त्या हल्लेखोरांना विचारला. याचाच राग आल्याने त्या दोन अनोळखी हल्लेखोरांनी ओम साई प्रॉपर्टीजच्या कार्यालयासमोर येऊन  त्यांच्याकडील पिस्टलमधून गमरे आणि त्यांच्या मित्राच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये चार ते पाच फैरी झाडण्यात आल्या. त्यातील एक गोळी गमरे यांच्या छातीमध्ये डाव्या बाजूला लागली. या घटनेनंतर त्यांना तातडीने कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात आर्म अ‍ॅक्ट कलम ३, २५ सह खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. घटनास्थळावरुन पोलिसांनी चार पुंगळया, एक जिवंत काडतुस आणि एक काडतुसाचा पुढील भाग (शिसा) जप्त केला आहे. पोलीस उपायुक्त अविनाश अंबुरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाह आणि निरीक्षक आनंद निकम यांचे पथक याप्रकरणी अधिक तपास करीत आहे. 

दूस-या घटनेमध्ये लोकमान्यनगरचा कुप्रसिद्ध गुंड गणेश जाधव उर्फ काळा गण्या याच्या डोक्यावर बिपीन मिश्रा आणि सौरभ शिंदे या त्याच्या पूर्वाश्रमीच्या साथीदारांनीच पैसे न दिल्याच्या रागातून गोळीबार केल्याची घटना २१ आॅक्टोबर रोजी सकाळी १०.३० वाजण्याच्या सुमारास लोकमान्यनगर पाडा क्रमांक येथील साईनाथ क्रीडा मंडळाच्या बाजूला असलेल्या जंगलातील नाल्याजव घडला. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला असून आरोपींचा शोध घेण्यात येत असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदाशिव निकम यांनी सांगितले. काळा गण्या याच्यावर २५ गुन्हे यात गंभीर जखमी झालेल्या काळा गण्या याच्यावर हाणामारी, खंडणी वसूली असे गंभीर स्वरुपाचे २५ गुन्हे वर्तकनगर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. तर बिपीन मिश्रा याच्यावरही सात ते आठ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टॅग्स :FiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीthaneठाणे