शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

लूटमार करणाऱ्या दोघांना ठाण्यात अटक; तलवारही हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2022 05:47 IST

चितळसर पोलिसांची कारवाई, ठाण्यातील रायकरवाडीमध्ये राहणारे दीपक साव हे आपले मित्र विजयकुमार यादव यांच्यासह  ४ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाण्यासाठी कापूरबावडीतील बसस्टॉप येथे जात होते.

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे :  तलवारीचा धाक दाखवून लूटमार करणाऱ्या  गणेश प्रभाकर धिवर (२२, माजीवाडा गाव, ठाणे) आणि  विक्की ओझा (२०, रा. वर्तकनगर, ठाणे) या दोघांना चितळसर पोलिसांनी शनिवारी अटक केली. जबरी चोरीसाठी त्यांनी वापरलेली तलवारही त्यांच्याकडून हस्तगत केल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांना ७ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे.

ठाण्यातील रायकरवाडीमध्ये राहणारे दीपक साव हे आपले मित्र विजयकुमार यादव यांच्यासह  ४ मार्च रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घरी जाण्यासाठी कापूरबावडीतील बसस्टॉप येथे जात होते. ते घोडबंदर रोडवर आले असता, विनाक्रमांकाच्या एका स्कूटरवरून आलेल्या गणेश आणि  विक्की या दोघांनी तलवारीच्या धाक दाखवून दीपक यांच्या पॅन्टच्या खिशातील चारशे रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरली. याप्रकरणी दोघांविरुद्ध जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. पथकाने प्रभाकर आणि विक्की या दोघांनाही पाठलाग करून काही तासांमध्ये अटक केली. 

याआधीही केली लूटमारnगणेश आणि विक्की या दोघांनी एक आठवड्यापूर्वीही घोडबंदर रोड भागात एका टँकरचालकाला पाणी मागण्याच्या बहाण्याने मोटारसायकल आडवी लावून त्याच्याकडून १८ हजारांची रक्कम जबरीने चोरली होती. nयाप्रकरणीही चितळसर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. याचा तपास सुरु हाेता. nया टोळीकडून जबरी चोरीचे आणखीही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.