शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी

By राजकुमार जोंधळे | Updated: April 28, 2025 23:30 IST

मागील भांडणाच्या कारणावरुन केली जबर मारहाण

राजकुमार जाेंधळे, अहमदपूर (जि. लातूर): तालुक्यातील हाडाेळतीत मागील भांडणाच्या कारणावरुन २१ वर्षीय युवकाला काठीने जबर मारहाण केल्याची घटना घडली हाेती. जखमी युवकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र त्याचा शनिवारी दुपारी मृत्यू झाला. याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात दाेघांविराेधात रविवारी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दाेघांनाही अटक केली असून, साेमवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

पाेलिसांनी सांगितले, हाडोळती येथील फिर्यादी छाया दत्तात्र्यय सूर्यवंशी यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पती, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार असून, पती हेअर सलूनमध्ये काम करतात. तर मोठा मुलगा पुणे येथे केटरींगचे काम करतो. लहान मुलगा बळीराम दत्तात्र्यय सूर्यवंशी (वय २१) हा गावातच माेलमजुरीचे काम करतो. मुलीचा विवाह झाला आहे. शनिवार, २६ एप्रिलरोजी सकाळी छाया सूर्यवंशी या उमरगा येथे कापूस वेचण्यासाठी गेल्या हाेत्या. तर पती दत्तात्र्यय लक्ष्मण सूर्यवंशी हे लातुर येथे औषधी आणण्यासाठी गेले हाेते. मुलगा बळीराम सूर्यवंशी हा दुपारी १:३० वाजण्याच्या सुमारास काही कामानिमित्त गौस समद शेख याच्या घरी गेला हाेता. दरम्यान, मागील भांडणाच्या कारणावरून बळीराम सूर्यवंशी याला गौस समद शेख आणि गफूर गौस शेख (दाेघेही रा. हाडोळती ता. अहमदपूर) यांनी काठीने जबर मारहाण केली. यामध्ये बळीराम हा गंभीर जखमी झाला. बेशुद्धावस्थेत पडलेल्या बळीरामला त्याच्या घरासमोर फेकून दिले. जखमी बळीरामला उपचारासाठी लातूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले असता, त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती स्वत: गौस समद शेख यांने फोनवरुन बळीराम याच्या वडिलाला सांगितली.

याबाबत अहमदपूर पाेलिस ठाण्यात छाया सूर्यवंशी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन गौस समद शेख, गफूर गौस शेख यांच्याविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल केला आहे. या दाेघांनाही पाेलिसांनी अटक केली. त्यांना साेमवारी अहमदपूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने मंगळवारीपर्यंत पाेलिस काेठडी सुनावली आहे.

टॅग्स :laturलातूर