शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

अजमेरमधून पैसे काढणारे दोघे अटकेत : कॉसमॉस बँक सायबर हल्ला प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2018 18:31 IST

Cosmos Bank Cyber Attack : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लुटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या एसआयटीने मुंब्रा येथील आणखी दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्दे१० कार्डद्वारे काढले साडेसात लाख रुपये अटक केलेले दोघेही मीरा रोड येथे एका गॅरेजमध्ये दुचाकी रिपेअरींगचे करतात काम कोल्हापूर, मुंबईतून पैसे काढणा-या सात जणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक

 पुणे : कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून ९४ कोटी रुपये लुटल्याप्रकरणी सायबर गुन्हे शाखेच्या एसआयटीने मुंब्रा येथील आणखी दोघांना अटक केली आहे. दोघांनाही अजमेर येथून १० बनावट एटीएम कार्डच्या माध्यमातून ७ लाख ५० हजार रुपये काढल्याचे तपासात समोर आले आहे.     रफिक जलाल अन्सारी (वय ३४), अब्दूल्ला अफसर अली शेख (वय २८, दोघेही रा. शॉप नं ४ स्टँडस्टोन सोसायटी, मीरा रोड, ठाणे) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष सुहास गोखले यांनी यासंदर्भात चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. अटक केलेले दोघेही मीरा रोड येथे एका गॅरेजमध्ये दुचाकी रिपेअरींगचे काम करतात. त्यांनी हल्ल्याच्या दिवशी त्यांनी अजमेर येथील एटीएममधून १० एटीएम कार्डच्या मदतीने साडेसात लाख रुपयांची रोकड काढली. बँकेच्या सर्व्हरवर हल्ला करून ११ त १३ आॅगस्ट दरम्यान ९४ कोटी ४२ लाखांची रोकड वेगवेगळ्या मार्गांनी काढण्यात आली होती. त्यापैकी ४१३ बनावट डेबीट कार्डच्या माध्यमातून २ हजार ८०० व्यवहार करून अडीच कोटीची रोकड देशातील विविध एटीएम केंद्रातून काढण्यात आली होती. तर १२ हजार व्यवहार व्हिसा कार्डद्वारे करण्यात आले होते. या गुन्हयाचा तपासासाठी सायबर गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त ज्योतीप्रिया सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले होते. मुंबई, इंदुर, कोल्हापूर, अजमेर येथील एटीएम केंद्रात मिळालेले सीसीटीव्ही चित्रीकरण तपासकामी ताब्यात घेण्यात आले होते. चित्रीकरणाद्वारे आरोपींचा माग काढण्यात येत होता. यापुर्वी अशाच प्रकारे कोल्हापूर, मुंबईतून पैसे काढणा-या सात जणांना सायबर गुन्हे शाखेकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी दोघांना मीरा रोड येथून अटक करण्यात आली आहे.   

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमbankबँकfraudधोकेबाजी