शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

कोकेनसह दोन नायजेरियन अटकेत, मीरा रोडमध्ये कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2019 04:11 IST

मीरा रोड : मीरा रोडच्या हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या उच्छादाविरोधात रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता काशिमीरा पोलिसांनीही कारवाई सुरू ...

मीरा रोड : मीरा रोडच्या हाटकेश भागात नायजेरियन नागरिकांच्या उच्छादाविरोधात रहिवाशांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता काशिमीरा पोलिसांनीही कारवाई सुरू केली आहे. पोलिसांनी दोघा नायजेरियन नागरिकांना अटक करून त्यांच्याकडून एक लाख ८० हजारांचे कोकेन जप्त केले आहे. याआधीही पोलिसांनी काही नायजेरियन नागरिकांना विविध गुन्ह्यांत अटक केली होती.हाटकेश परिसरात काही वर्षांपासून नायजेरियन नागरिकांनी घातलेल्या धुमाकुळामुळे स्थानिक रहिवासी मेटाकुटीला आले आहेत. रात्रभर चालणारा धिंगाणा, बेकायदा बार, अमली पदार्थांची विक्री व सेवन आदी विरोधात रहिवाशांनी शिवसेनेच्या माध्यमातून अनेकवेळा आंदोलने केली, पोलिसांकडे तक्रारी, निवेदने दिली आहेत.रहिवाशांच्या वाढत्या तक्रारीनंतर भार्इंदर विभागाचे सहायक पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी येथे छापा घालून कारवाया सुरू केल्या आहेत. २५ जानेवारीला पाच जणांना अटक करून अडीच लाखांचे कोकेन व पावणेतीन लाखांचे आठ मोबाइल जप्त केले होते. मुंबई पोलिसांनीही येथून नायजेरियन नागरिकांना गंभीर गुन्ह्यात अटक केली होती.येथील नायजेरियन नागरिकांचा ठोस बंदोबस्त करावा, म्हणून शाखाप्रमुख महेश शिंदे यांनी शिवसेना व रहिवाशांच्या वतीने आंदोलनाचा इशारासुद्धा नुकताच दिला होता. त्यावर काशिमीरा पोलिसांनी नायजेरियन नागरिकांवर कारवाई सुरू असल्याचे आश्वासन देत आंदोलन करू नये, असे पत्र दिले होते.पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक दत्ता लोंढे, उपनिरीक्षक प्रकाश गोसावी व क्रांती पाटील, काशिमीरा, मीरा रोड, नयानगर पोलिसांनी मिळून शनिवारी सायंकाळी हाटकेश येथे नाकाबंदी करून दोन नायजेरियन नागरिकांना अटक केली.अ‍ॅचिपाँग इमेन्युअल (३७) व ओदोई ख्रिस्तोपर टोनी (२०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मूळचे आफ्रिकेच्या घाना येथील रहिवासी असून सध्या हाटकेशच्या थ्रीडी क्रिएशनशेजारी राहत होते. त्यांच्याकडून एक लाख ८० हजार किमतीचे १८ ग्रॅम कोकेन, दोन मोबाइल व इलेक्ट्रीक वजनकाटा जप्त केला आहे.

टॅग्स :Arrestअटक