शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या

By सुरेंद्र राऊत | Updated: April 30, 2025 21:14 IST

मंगळवार व बुधवार या दोन दिवसात दोन जणांचा खून

सुरेंद्र राऊत, यवतमाळ: शहरातील खुनाचे सत्र सातत्याने सुरू आहे. मंगळवार व बुधवार या दोन दिवसात बारा तासांमध्ये खूनाच्या दोन घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. तलाव फैल पावर हाऊस परिसरात चुलत जावई व साळा एकत्र दारू पीत असताना वाद झाला. या वादात साल्याने जावायावर चाकूने हल्ला करून जागीच ठार केले. जगदीश ठाकूर वय 48 रा पिंपळगाव झोपडपट्टी असे मृताचे नाव आहे. त्याचा खून नितीन मनोहर कटरे वय 37 पावर हाऊस तलाव फैल याने केला, अशी तक्रार शेरूची पत्नी राधिका ठाकूर हिने शहर पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून नितीन कटरे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे.

या गुन्ह्याचा पंचनामा संपत नाही तोच पिंपळगाव परिसरात बालाजी मंगल कार्यालयाजवळ लहान भावाने मालमत्तेवरून वाद घालत मोठ्याचा खून केला. ही घटना बुधवारी सायंकाळी सहा वाजता घडली. प्रमोद पंढरी पेंदोर वय 37 असे मृताचे नाव आहे. कवीश्वर पंढरी पेंदोर वय 35 असे आरोपीचे नाव आहे त्याने लोखंडी रॉड ने मोठ्या भावावर हल्ला करून त्याला जागीच ठार केले. याप्रकरणी प्रमोदची पत्नी सपना यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी कवीश्वर पेंदोर यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

शहर पोलीस ठाण्यातील ठाणेदार रामकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनात शोध पथकातील प्रमुख सहाय्यक निरीक्षक विकास दंदे, जमादार प्रदीप नाईकवाडे, रावसाहेब शेंडे, गौरव ठाकरे, मिलिंद दरेकर, सुनील पैठणे आदींनी दोन्ही गुन्ह्यातील आरोपींना तात्काळ अटक केली.

टॅग्स :YavatmalयवतमाळDeathमृत्यू