शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या आणखी दोघांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2021 19:47 IST

Remdesivir Black marketing : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन येत होते बाहेर

ठळक मुद्देगोंदिया शहरातील नामांकीत असलेल्या बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन रूग्णांना न लावता बाहेर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

गोंदिया: सरकारी रूग्णालयांमधून रेमडेसिविर इंजेक्शन रूग्णांना न लावता तेच इंजेक्शन काळ्या बाजारात विक्री करणाऱ्या टोळीतील आणखी दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी (दि.५) रंगेहाथ पकडले आहे. गोंदिया शहरातील नामांकीत असलेल्या बाहेकर हॉस्पिटलमधून इंजेक्शन रूग्णांना न लावता बाहेर येत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ५ मे रोजी गोंदिया शहर परिसरात रेमडेसिविर औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. कोविड-१९ आजारातील रुग्णांवर उपचाराकरीता वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिविरचा काळाबाजार करणाऱ्या आरोपी अमोल नितेश चौधरी (२१) रा. विठ्ठल रुक्मीणी चौक, छोटा गोंदिया या रूग्णवाहिका चालकाला दोन रेमडेसिविर इजेक्शनसह अटक केली आहे. तो प्रत्येकी १५ हजार रूपयात या इंजेक्शनची विक्री करीत होता. स्थानिक गुन्हे शाखेने बोगस ग्राहक पाठवून त्याला अडकविले. बाहेकार हॉस्पिटलजवळ उभ्या असलेल्या अमोल चौधरी याच्याकडून दोन रेमडेसिविर इंजेक्शन जप्त करण्यात आले. त्याने हे इंजेक्शन बाहेकार हॉस्पिटमध्ये सफाई कामगार म्हणून काम करणाऱ्याकडून आणल्याचे सांगितले. सफाई कामगार संजय तुरकर याला विचारणा केल्यावर त्याने बाहेकार हॉस्पिटलमधील एका नर्सकडून आणल्याचे सांगितले. ४३ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र मेश्राम, अभयसिंह शिंदे, सहाय्यक फौजदार लिलेन्द्रसिंह बैस, चंद्रकांत करपे, राजेंद्र मिश्रा, तुलसीदास लुटे, रेखलाल गौतम, इंद्रजित बिसेन, महेश मेहर, अजय राहांगडाले, विजय मानकर, संतोष केदार, महिला पोलीस शिपाई गेडाम यांनी केली आहे. तिन्ही आरोपींविरूध्द गोंदिया शहर पोलिस ठाण्यात भादंविच्या कलम ४२०,१८८, ३४, सहकलम २६ औषध नियंत्रण किंमत आदेश २०१३, सहकलम ३ (क), ७ जिवनावश्यक वस्तू अधिनियम १९५५, सहकलम १८ (क), २७ (ख),(दोन) औषधी व सौंदर्य प्रसाधन कायदा १९४० व नियम १९५४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

रूग्णाना इंजेक्शन न लावता जात होते काळ्याबाजारात विक्रीला 

बाहेकर हॉस्पिटलमधील रूग्णवाहिका चालक अमोल नितेश चौधरी याने सफाई कामगार संजय रमेश तुरकर रा. छोटा गोंदिया यांच्याकडून त्या इंजेक्शन आणल्या. संजय तुरकरने त्या इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलधील नर्सकडून आणल्याचे सांगितले. हे तिन्ही कर्माचरी बाहेकर हॉस्पिटलमधील आहेत. अमोलच्या पँटचे खिशातून दोन मिथिल प्रेडनिसोलोन सोडीयम इंजेक्श्न मिळून आले. त्यास रेमडेसिविर व मिथिल प्रेडनिसोलोन इंजेक्शन बाहेकर हॉस्पिटलमधून आणल्याचे सांगितले.

टॅग्स :remdesivirरेमडेसिवीरPoliceपोलिसArrestअटक