शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अंबरनाथमध्ये व्यावसायिकाच्या घरावर दोघांचा गोळीबार; दुचाकीवरून हल्लेखोर पसार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 06:20 IST

पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही घटना पनवेलकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

अंबरनाथ - अंबरनाथमध्ये बांधकाम व्यावसायिक विश्वनाथ पनवेलकर यांच्या घरावर गोळीबाराची घटना सोमवारी दुपारी घडली. दुचाकीवरून दोन अनोळखी हल्लेखोरांनी पनवेलकर यांच्या घरावर दोन गोळ्या झाडून पळ काढला. जितेंद्र पवार असे गोळीबार करणाऱ्याचे नाव असून, त्याच्यावर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी येरवडा जेलमध्ये स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती.

अंबरनाथच्या हुतात्मा चौकाजवळ उद्योजक पनवेलकर यांचे ‘सीताई सदन’ नावाने घर आहे. सोमवारी अडीचच्या सुमारास पनवेलकर यांच्या घराबाहेर दुचाकीवरून दोन  हल्लेखोर आले आणि त्यांनी पनवेलकर यांच्या घराच्या गेटच्या दिशेने दोन गोळ्या झाडून पळ काढला. ही घटना पनवेलकर यांच्या घराबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. 

हल्लेखोर नामचीन गुंडआरोपी जितेंद्र पवारवर २०२३ मध्ये एमपीडीए कायद्यांतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. जेलमध्ये नेताना त्याने पत्रकारांवर दगड भिरकावला होता. भाजपच्या माजी नगरसेवकाच्या कार्यालयावर झालेल्या तलवार हल्ले प्रकरणातही त्याचे नाव आले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र, अद्याप पोलिसांनी आरोपीबाबत अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही.  

पनवेलकर होते कोर्टात विश्वनाथ पनवेलकर हे सोमवारी सकाळीच मुंबई उच्च न्यायालयात कामानिमित्त गेले होते. न्यायालयात असतानाच त्यांना आपल्या घरावर हल्लेखोरांनी गोळीबार झाल्याची माहिती मिळाली. या घटनेमुळे  गोळीबार करणारा व्यक्ती आणि त्यामागचा सूत्रधार यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली.

आरोप-प्रत्यारोपआमचे दगड खदानीच्या प्रकरणात वाद सुरू आहेत. त्याच वादातून हा गोळीबार करण्यात आला असून त्यात बदलापूरच्या आमदारांचा हात असल्याचा मला संशय आहे. या आधीही आम्हाला अशा प्रकारच्या धमक्या आल्या होत्या. - विश्वनाथ पनवेलकर, उद्योजक

चोराच्या मनात चांदणे. त्यांनीच त्यांच्यावर हा गोळीबार घडवून आणल्याचा संशय आहे. असे प्रकार करण्याची मला कधी गरज पडलेली नाही. या प्रकरणाची चौकशी होईलच आणि सत्य बाहेर येईल. - किसन कथोरे, आमदार