शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आर्यन खानसह तिघांना कोर्टाने दिला दणका; ७ ऑक्टोबरपर्यंत NCB कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 19:02 IST

Aryan Khan Remanded till 7th Oct : शाहरुखच्या लेकाने मोठा दणका कोर्टाने दिला आहे.

ठळक मुद्देआर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या तीन रात्री एनसीबी कोठडीत असणार आहेत. 

मुंबई - NCB ने शनिवारी रात्री रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईत बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आलं असून त्याच्यासह इतर दोघांना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबी कोठडी सुनावण्यात आली. त्यामुळे शाहरुखच्या लेकाला मोठा दणका कोर्टाने दिला आहे. कालची रात्र एनसीबी कोठडीत घालवली. आता तीन रात्री कोठडीत काढाव्या लागणार आहे. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांच्या तीन रात्री एनसीबी कोठडीत असणार आहेत. 

आर्यनकडे ड्रग्ज सापडलं नाही. तसेच त्याला पाहुणा म्हणून पार्टीत नेलं होतं, आर्यनची बाजू मांडणारे वकील सतीश मानेशिंदे यांचा कोर्टात दावा केला तर अरबाजकडे 6 ग्रॅम चरस सापडलं असा एनसीबीच्या वकिलांनी कोर्टात दावा केला. कोर्टात सुनावणीदरम्यान क्रूझ ड्रग्ज पार्टीचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा एनसीबीकडून दावा करण्यात आला, त्याबाबतच्या तपासासाठी ११ ऑक्टोबरपर्यंत कोठडी मिळावी अशी मागणी एनसीबीने केली होती. आर्यनच्या चॅटमध्ये धक्कादायक माहिती मिळाल्याचा एनसीबीने दावा केला आहे. 

एनसीबीच्या वतीनं अनिल सिंह युक्तिवाद करत आहेत. क्रूझवरून अटक करण्यात आलेल्या आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना ९ दिवसांची एमसीबी कोठडी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. आर्यनच्या फोनमधून आक्षेपार्ह बाबी हाती लागल्या असल्याचं सिंह यांनी न्यायालयाला सांगितलं. 'आर्यनच्या फोनमध्ये सापडलेले काही फोटो आक्षेपार्ह आहेत. आर्यनच्या फोनमध्ये सापडलेल्या लिंक्स आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थांच्या तस्करीशी संबंधित आहेत,' असा दावा सिंह यांनी केला.

 

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थCourtन्यायालय