शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मैत्रिणीच्या डिमांड संपत नव्हत्या; वैतागलेल्या मित्रानं तिलाच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2022 16:18 IST

सांताक्रूझमधील तरुणीची पालघरला नेऊन हत्या; विलेपार्लेतील मित्राच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबई: सांताक्रूझमधुन बेपत्ता असलेल्या पिंकी क्लिफॉर्ड मिस्क्वित्ता (२९) या तरुणीच्या हत्येप्रकरणी तिचा मित्र झिको अंसलिम मिस्कित (२७) याला विलेपार्लेतून शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले. महागड्या भेटवस्तू, रोज फिरायला नेण्याच्या पिंकीच्या नेहमीच्या डिमांडचा त्याच्या डोक्याला ताप झाला होता. पिकींच्या मागण्या संपत नव्हत्या म्हणून कंटाळून तिलाच संपवले असे त्याने गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ मधील अधिकाऱ्यांना सांगितले असून या प्रकारामुळे सांताक्रूझमध्ये खळबळ उडाली आहे.

सदर तरुणी २४ डिसेंबर, २०२१ पासून बेपत्ता झाल्यावर सांताक्रूझ पोलीस ठाण्यात त्याबाबत नोंद करण्यात आली होती. त्यानुसार सांताक्रूझ पोलिसांसह गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कक्ष ९ चे अधिकारी देखील याचा तांत्रिक तपास करत होते. ज्यात पिंकीचा एक मित्र असल्याची माहिती त्यांना मिळाली. तेव्हा त्यासाठी त्यांनी झिकोला ताब्यात घेत त्याची कसून चौकशी केली. पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, झिको सुरुवातीला काहीच माहिती देत नव्हता. मात्र पोलिसी खाक्या दाखवल्यावर त्यानेच तिची हत्या केल्याची कबुली दिली.पिंकी त्याची जुनी मैत्रीण होती. मात्र ती नेहमी त्याच्याकडून महागड्या भेटवस्तू तसेच बाहेर फिरायला नेण्याची मागणी करत होती. त्यामुळे तो वैतागला होता. झिकोचे अन्य मुलीवर प्रेम असल्याने अखेर पिंकीचा त्रास कायमचा संपवायचा असे त्याने ठरवले. त्यानुसार एका स्कुटीवरुन दोघे पालघरला फिरायला गेले. जिथे तिच्या वागण्यावरुन, भेटायला बोलावण्यावरुन त्यांच्यात भांडण झाले. त्यानंतर झिकोने २४ डिसेंबरच्याच रात्री त्याच्या अन्य एका मित्राच्या (कुमार) मदतीने पिंकीला जेट्टी परिसरात असलेल्या डोंगराळ भागात धक्का दिला. तेव्हा ती खाली पडली आणि गंभीर जखमी झाल्याने तिचा मृत्यू झाला. यानंतर झिकोने त्याची स्कुटी कुमारला घेऊन जाण्यास सांगत अन्य मित्रांसोबत ट्रिपल सीट तो घरी परतला.झिकोच्या कबुलीनंतर आरोपीला अधिक तपासासाठी कक्ष ९ ने पालघर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक संजय खताळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आहेर, नाळे, सहायक पोलीस निरिक्षक महेंद्र पाटील आणि पथकाने हा गुन्हा उघडकीस आला. झिकोला मदत करणाऱ्या त्याच्या कुमार नामक साथीदाराला पालघर पोलिसांनी विरारमधून अटक केली आहे. गुरुवारी पिंकीचा पूर्णपणे कुजलेला आणि गळ्यात दगड बांधलेला मृतदेह पालघर जिल्ह्यातील विकसनशील जेट्टीजवळ मिळाला होता.