शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडले; माजी नगरसेविकेच्या घरावर जमावाची दगडफेक

By पंकज पाटील | Updated: June 13, 2025 22:25 IST

अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे.

- पंकज पाटील

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये किरकोळ वादातून दोन गट भिडल्याची घटना घडली. गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिवीगाळ केली असा आरोप नगरसेविकेने केला आहे. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिवीगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले. यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली.

अंबरनाथच्या बारकू पाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही आज सायंकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे अबोली हिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न मारला. मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकले असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली असा आरोप अबोली यांनी केला आहे. तर दुसरीकडे या तरुणाने अबोली हिनेच आपल्याला शिवीगाळ केली असा आरोप केला आहे. ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी शिवीगाळ करणाऱ्या फासेपारधी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले. मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच फासेपारधी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला. तसेच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली.

या सगळ्या प्रकरणानंतर फासेपारधी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे.

टॅग्स :ambernathअंबरनाथ