शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

डोंबिवली रेल्वे स्थानकात आरक्षण तिकिट घरात दोन गटात हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 12:32 IST

लांबपल्याच्या गाडीचे तिकिट आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी घडल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आरक्षण तिकिटा कार्यालयात रविवारी मध्यरात्री घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तिच्या डोक्याला जखम झाली असून त्या घटनेतील तिघा हल्लेखोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा तर एका पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देदोन महिलांसह एका पुरुष हल्लेखाराला अटक लोहमार्ग पोलिसांची कारवाई

डोंबिवली: लांबपल्याच्या गाडीचे तिकिट आरक्षण करण्यासाठी रांग लावण्यावरुन झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारी घडल्याची घटना डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या आरक्षण तिकिटा कार्यालयात रविवारी मध्यरात्री घडली. त्या हाणामारीत एका व्यक्तिच्या डोक्याला जखम झाली असून त्या घटनेतील तिघा हल्लेखोरांना लोहमार्ग पोलिसांनी अटक केली असून त्यात दोन महिलांचा तर एका पुरुषाचा समावेश आहे.लोहमार्ग पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गौरीप्रसाद हिरेमठ यांनी दिलेल्या माहितीनूसार मिथिलेश मिश्रा व महेंद्रा मिश्रा या दोन महिलांसह अखिलेश गुप्ता या पुरुष हल्लेखोराला अटक करण्यात आली असून तिघेही डोंबिवलीचेच रहिवासी आहेत. त्यांच्या विरोधात सुरज गुप्ता याने पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून त्यावरुन चौकशी केली असता हल्लेखोरांना अटक करण्यात आल्याचे हिरमेठ म्हणाले. रविवारी रात्री ११.३० वाजता स्थानकात पश्चिमेकडील आरक्षण तिकिट घरानजीक लांबपल्याच्या गाड्यांचे तिकिट काढण्यासाठी जी रांग लागते, त्या रांगेत उभे राहण्यावरुन महिलांमध्ये वाद झाला. त्यानंतर त्यांनी पुरुषांना बोलावले, त्यानंतर वादाचे पर्यावसन मारहाणीत झाले,एकाला डोक्यात दगड मारण्यात आल्याने त्यास जखम झाल्याचे तक्रारदार गुप्ता याने सांगितले. मध्यरात्री उशिराने ही घटना घडल्यानंतर जखमीला तातडीने स्थानकातील फलाट क्रमांक १ वरील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, तेथेच उपचारही करण्यात आले असल्याचे हिरेमठ म्हणाले. त्यानूसार सोमवारी सकाळी घटनेची चौकशी, सीसी फुटेज बघितल्यानंतर सकाळी १०.३० च्या सुमारास गुन्हा नोंदवण्यात आला. तसेच वरिल तिघांना अटक करण्यात आली असून त्यांना कल्याण रेल्वे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच या घटनेचा पुढील तपास पोलिड निरिक्षक हरिदास डोळे करत आहेत.* घटना घडली त्यावेळी आरक्षण तिकिट घराजवळ रेल्वे पोलिस दलाचे कर्मचारी नव्हते का? तसेच आरक्षण तिकिट घराजवळून हाकेच्या अंतरावर लोहमार्ग पोलिस ठाणे आहे, मात्र तरीही वादविवाद झाल्यानंतर हाणामारीची घटना, त्यात एकावर जीवघणे हल्ला झालाच कसा? सुरक्षा यंत्रणेचा आभाव असल्याने ही घटना घडली. त्यामुळे प्रवाशांची सुरक्षा पुन्हा एरणिवर असल्याची चर्चा प्रवाशांमध्ये सुरु होती.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीkalyanकल्याणPoliceपोलिसDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस