शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

एकाच मुलावर दोघींचा जीव जडला, २०-२५ जण एकमेकांना भिडले; हाणामारी, तोडफोड अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2022 12:54 IST

या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते. 

कानपूर - शहरात एका युवकासाठी दोन मुलींमध्ये मोठा राडा झाल्याचं पाहायला मिळालं. या दोघींनी २०-२५ तरुणांची टोळी बोलावली. बर्राच्या पटेल चौकात दोन्ही गट एकमेकांना भिडले. या मारहाणीत दगडफेकही करण्यात आली. इतकेच नाही तर या झटापटीत पिस्तुलातून गोळीही चालवली परंतु त्यात कुणी जखमी झाले नाही. सध्या पोलिसांनी या दोन्ही गटाविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे. 

बर्रा परिसरात २ मुलींचं एकाच मुलावर प्रेम होते. त्यावरून या दोन्ही मुली एकमेकींविरोधात खुन्नस काढत होत्या. बुधवारी रात्री प्रियकरावरून दोन्ही प्रेयसी एकमेकांना धमकावू लागल्या. रात्री उशिरा पटेल चौकात दोन्ही गटाकडून २०-२५ युवक कार-बाईक घेऊन पोहचले. यावेळी वातावरण चांगलेच पेटले. दोन्ही गटात मारामारी झाली. त्यात ३ कारची तोडफोड करण्यात आली. या घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी पोहचेपर्यंत सगळेच पसार झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस निरीक्षक संजय पांडे म्हणाले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. परिसरातील पेट्रोल पंपावर लागलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहेत. या प्रकरणी युवतीने प्रियकरावर बर्थडे पार्टीत कोल्ड ड्रिंक्स देत त्यात नशेचं औषध पाजल्याचा गंभीर आरोप केला आहे. या संपूर्ण घटनेची पोलीस चौकशी होत आहे. लवकरच दोषींवर योग्य ती कारवाई करू असं त्यांनी सांगितले आहे. 

नेमकं काय घडलं?बर्रा परिसरात २ युवतींमध्ये एका युवकावरून भांडण झाले. या दोघींनी एकमेकींना धमक्या दिल्या. त्यानंतर रात्री उशिरा पटेल चौकात दोन्ही बाजूचे युवक मोठ्या संख्येने जमले. त्यावेळी स्कॉर्पिओ, क्रेटा आणि ५-६ बाईक्सने युवक पोहचले. दोन्ही गट आमनेसामने आल्याने मोठा राडा झाला. त्यात क्रेटा कारची युवकांनी तोडफोड केली. एकाने पिस्तुल काढून गोळीबार केला परंतु ती गोळी कुणाला लागली नाही. तर दुसऱ्या युवकाने पिस्तुलानेच युवकाच्या डोक्यावर जोरदार हल्ला केला. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झाले होते.