शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई ठाण्यातून हद्दपार केलेल्या दाेन गुंडांना पुन्हा अटक, मनाई आदेशाचा केला भंग

By जितेंद्र कालेकर | Updated: December 28, 2023 21:05 IST

कळवा, वर्तकनगर पाेलिसांनी केली कारवाई

जितेंद्र कालेकर, लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मुंबई, ठाण्यासह चार जिल्हयातून दाेन वषार्करीता हद्दपार केलेल्या आशिष रमेश सुरी (२४, रा. विटावा, कळवा, ठाणे) आणि दिपक सिताराम धनवाल ( ३०, रा.लोकमान्यनगर पाडा क्रमांक ३, ठाणे) या दाेघांना अनुक्रमे कळवा आणि वर्तकनगर पाेलिसांनी अटक केल्याची माहिती गुरुवारी दिली. या दाेघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आशिष सुरी याच्यावर हाणामारीचे अनेक गुन्हे दाखल असल्यामुळे त्याच्या गुन्हेगारी कारवायांना आळा बसण्यासाठी परिमंडळ एकचे पाेलिस उपायुक्त गणेश गावडे यांनी त्याला ठाणे, मुंबई, पालघर आणि रायगड या जिल्हयातून दाेन वषार्ंच्या कालावधीसाठी हद्दपार करण्याचे आदेश ७ जुलै २०२२ राेजी दिले हाेते. त्याने याच आदेशाचा भंग करुन ताे कळव्यातील विटावा भागात िफरत असल्याची माहिती कळवा पाेलिसांना मिळाली. त्याच आधारे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक कन्हैया थाेरात यांच्या पथकाने त्याला २८ डिसेंबर २०२३ राेजी पहाटे २.५० वाजण्याच्या सुमारास ताब्यात घेतले.

२८ डिसेंबर २०२३ रोजी २ वाजून ५० मि.चे सुमारास, विटावा नाका, कळवा, ठाणे पश्चिम येथे कळवा पोलीस ठाणेचे पथकास मिळुन आला. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अशीच कारवाई वर्तकनगर पाेलिसांनी दिपक धनवाल या आराेपीविरुद्ध केली. त्याला ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि रायगड या पाच जिल्हयातून दाेन वषार्साठी हद्दपार करण्याचे आदेश ७ जून २०२३ राेजी वागळे इस्टेट परिमंडळाचे पोलीस उपायुक्त अमरसिंग जाधव यांनी दिले हाेते. ताे या आदेशाचा भंग करुन लाेकमान्यनगर भागात फिरतांना आढळल्याने त्याला वरिष्ठ पाेलिस निरीक्षक सदाशिव निकम यांच्या पथकाने २७ डिसेंबर २०२३ राेजी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्धही कलम १४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी