शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

खवल्या मांजर विक्री प्रकरणातील आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 22:12 IST

जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठळक मुद्देन्यायालयाच्या निर्देशानुसार निसर्गमुक्त : तपासासाठी वनाधिकारी मध्यप्रदेशात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिवंत खवल्या मांजराची विक्री करताना दोन दिवसांपूर्वी अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना सावनेरच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या खवल्या मांजराला न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गमुक्त करण्यात आले असून प्रकरणाच्या अधिक तपासासाठी वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी मध्यप्रदेशात रवाना झाले आहेत.संजय लहानुजी गजभिये, माणिक शालीकराम बेटे आणि मुन्ना बुद्धू बेटे अशी या आरोपींची नावे आहेत. खापा वनपरिक्षेत्रावत खापा-सावंगी रोडवर ८ फेब्रुवारीच्या सायंकाळी सिनेस्टाईल पाठलाग करून या आरोपींना जिवंत खवल्या मांजरासह पकडण्यात आले होते. त्यांच्याकडून एक बोलेरो पिकअप चारचाकी वाहन आणि दोन दुचाकी जप्त केल्या होत्या. खवल्या मांजरला ट्रँझिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. हा प्राणी तंदुरुस्त असल्याचे लक्षात आल्यावर सोमवारी दुपारी त्याला न्यायालयाच्या आदेशानुसार निसर्गमुक्त करण्यात आले.या तिन्ही आरोपींंना सोमवारी सावनेर प्रथम श्रेणी नायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता, तिघांचाही दोन दिवसांचा फॉरेस्ट कस्टडी रिमांड मिळाला आहे, यापैकी दोन आरोपी मध्यप्रदेशमधील असल्यामुळे सखोल तपासासाठी सहायक वनसंरक्षक एस. टी. काळे व वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण नाईक हे मध्यप्रदेशात तपास करीत आहेत.

टॅग्स :wildlifeवन्यजीवSmugglingतस्करी