शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात घड्याळांची चोरी करून पळणारे कल्याणमध्ये जेरबंद; ठाणे गुन्हे शाखेची कामगिरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2022 09:18 IST

साडेचार लाखांचा माल हस्तगत

ठाणे : पुण्यातील विश्रांतवाडीतील एका दुकानातून लाखोंच्या घड्याळांची चोरी करून झारखंडमध्ये पलायनाच्या तयारीतील शाहआलम शेख (५३, रा. साहेबगंज, झारखंड) याच्यासह दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट एकने अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी शुक्रवारी दिली. त्यांच्याकडून चार लाख ४८ हजारांची २९० घड्याळेही जप्त केली आहेत.घरफोडीतील काही संशयित कल्याण रेल्वेस्थानकात येणार असल्याची टीप ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल देशमुख, निरीक्षक कृष्णा कोकणी, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, संदीप चव्हाण, उपनिरीक्षक दिपेश किणी, हवालदार राजेंद्र सांबरे, भरत आरवंदेकर, हरीश तावडे, दीपक जाधव, अमोल देसाई, नंदकुमार पाटील आणि शब्बीर फरास आदींच्या पथकाने गुरुवारी कल्याण रेल्वेस्थानकातून परराज्यात जाण्याच्या तयारीतील शाहआलम आणि रुंदल सिंग निरंजन सिंग (३०, रा. झारखंड) या दोघांना ताब्यात घेतले. सखोल चौकशीमध्ये त्यांनी १८ जानेवारी रोजी पुण्यातील विश्रांतवाडीतील घड्याळाचे दुकान फोडून चोरी केल्याची कबुली दिली. हाच मुद्देमाल घेऊन ते त्यांच्या झारखंड राज्यातील मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचेही त्यांनी सांगितले.पुण्यात चोरीचा गुन्हाठाणे पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये १९ जानेवारी रोजी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली. या दोघांनीही विश्रांतवाडीतील धानोरीतील भैरवनगर येथे राजेश्वरी वॉच ॲण्ड ऑप्टिशियन या दुकानाच्या खिडकीचे गज रात्रीच्या वेळी कापून चोरी केल्याचे उघड झाले.या दोघांवरही गुन्हे दाखलशाहआलम याच्याविरुद्ध झारखंडमधील राधानगर, नवी मुंबईतील वाशी आणि ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रुंदल सिंगविरुद्ध झारखंडमध्ये गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.