शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोघांना नालासोपाऱ्यात अटक; आचोळे शाखेची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2022 22:01 IST

चोरी करण्यासाठी वापरलेली दुचाकी पोलिसांच्या ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा: आचोळा पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांनी ६५ वर्षीय महिलेच्या गळ्यातून सोन्याची माळ खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपीकडून खेचून नेलेली माळ आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली दुचाकी हस्तगत केली असून पुढील तपास करत आहे.

डॉन लेनच्या भारत कॉलनीत राहणाऱ्या सुनीता गुंडये (६५) या शनिवारी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास पाच वर्षांच्या नातीला घेऊन फेरफटका मारण्यासाठी गाळा नगरकडे जाणाऱ्या रस्त्यावरून चालत होत्या. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांपैकी एकाने त्यांच्या गळ्यातून ८ ग्रॅम वजनाची सोन्याची माळ खेचून नेली होती.  आचोळा पोलिसांनी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याच्या तपासाला सुरुवात केली. महितीदाराकडून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की, नालासोपारा पश्चिमेकडील राजोडी परिसरातील एका घरात चोरटे लपून बसले आहे. तात्काळ पोलिसांचे एक पथक त्याठिकाणी जाऊन जयराम पाटील (३३) आणि मनिष बसवत (२४) या दोन आरोपींना ३१ जुलैला ताब्यात घेऊन अटक केली. दोन्ही आरोपींकडून पोलिसांनी चोरी केलेली सोन्याची माळ आणि दुचाकी असा एकूण ६५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

"जबरी चोरी करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक करून १ ऑगस्टला वसई न्यायालयात हजर केल्यावर ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे", अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक (आचोळा) चंद्रकांत सरोदे यांनी दिली.

टॅग्स :palgharपालघरCrime Newsगुन्हेगारीChain Snatchingसोनसाखळी चोरी