शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

समाज कल्याणच्या लाचखोर निरीक्षकास अडीच वर्षांचा कारावास, जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल

By सचिन राऊत | Updated: September 30, 2022 19:58 IST

२००५ मध्ये स्वीकारली होती पाचशे रुपयांची लाच

अकोला: अकोट तालुक्यातील  मूकबधिर संस्था दर्यापूर तालुक्यातील एका दुसऱ्या गावात स्थलांतरित करण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना समाज कल्याण निरीक्षकाला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केल्यानंतर या प्रकरणातील दोषी लाचखोर निरीक्षकास जिल्हा व सत्र न्यायालयाने शुक्रवारी दोन वर्ष सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १५ हजार रुपयांचा दंड ठोठावला असून दंड न भरल्यास अतिरिक्त पाच महिन्यांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद न्यायालयाने केली आहे.

समाज कल्याण विभागाचा लाचखोर निरीक्षक ब्रह्मदेव श्रीराम लोळे वय ४६ वर्ष याच्याकडे अकोट तालुक्यातील सावरा येथील मूकनायक सेवा संस्थेद्वारा कार्यान्वित असलेली श्री संत गाडगेबाबा मूकबधिर विद्यालय ही संस्था दर्यापूर तालुक्यातील नांदरून या गावात स्थलांतरित करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यासाठी लाचखोर समाज कल्याण निरीक्षक लोळे यांनी २५ जानेवारी २००५ रोजी पाचशे रुपयांची लाच मागितली होती. यावेळी लाचेची रक्कम स्वीकारताना त्याला अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर लाचखोर समाज कल्याण निरीक्षक ब्रह्मदेव लोळे यास दोषी ठरवीत दोन वर्ष सहा महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावली. यासोबतच १५ हजार रुपयांच्या दंडही ठोठावला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAkolaअकोला