शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

हत्या करून पसार झालेल्या दोन  आरोपींना अवघ्या २४ तासांत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 07:56 IST

Crime News: दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला.

ठाणे : मफतलाल कंपनीतील मोकळ्या जागेत बसलेल्या दोन जोडप्यांना दोघांनी एवढ्या रात्री इथे काय करत आहात, घरी जा, असे सांगितल्याने त्याचा राग या दोघा मुलांना आला व त्यांनी रागाच्या भरात सुनील सोनावणे यांच्यावर चाकूने हल्ला करून त्यांची हत्या केली, तर त्यांचा मित्र नरेशबाबू यालाही गंभीर जखमी करून पळ काढला होता. परंतु अवघ्या २४ तासांत या हत्येतील फरार आरोपी विक्रम पटवा (२४, रा भास्करनगर, कळवा आणि मोहम्मद उस्मान रहमान शाह (२५, रा. भास्करनगर, कळवा) या दोघांना कळवा पोलिसांनी अटक केली.कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २० मे रोजी रात्री ११.३० च्या सुमारास मफतलाल कंपनीच्या कम्पाऊंडमध्ये असलेल्या हनुमान मंदिराजवळील नारळाच्या झाडाजवळ मोकळ्या जागेत यातील फिर्यादी व त्याचे मित्र सुनील सोनावणे यांनी सदर ठिकाणी बसलेल्या दोन अनोळखी जोडप्यांना बहुत रात हुई है । यहा क्यू रूके हो घर पे जाओ, असे बोलल्याचा राग आल्याने त्यांनी फिर्यादीचा मित्र सुनील सोनावणे याच्यावर चाकूहल्ला करून गंभीर जखमी केले. यात त्याचा मृत्यू झाला. तर फिर्यादीसही चाकू मारून गंभीर जखमी केले. या प्रकरणात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकाला मिळालेल्या माहितीनुसार दोन महिलांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी या गुन्ह्यातील विक्रम पटवा व मोहम्मद उस्मान यांची नावे सांगितले. परंतु त्यांची माहिती अपूर्ण असल्याने त्यांचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.