शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

क्रूझ ड्रग्ज पार्टीप्रकरणी 'या' दोन आरोपींची जामिनावर सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2021 21:59 IST

आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांची ...

ठळक मुद्देनसीबीने राजघारीयाकडून 2.4 ग्रॅम गांजाही जप्त केला होता. तर अविन साहूकडून काहीही जप्त करण्यात आलं नव्हतं.

आर्यन खान ड्रग्ज पार्टी प्रकरणात आज दोन आरोपींना जामीन मंजूर झाला आहे. विशेष NDPS कोर्टाने आज या प्रकरणात दोघांची जामिनावर सुटका केली आहे. मनिष राजघारिया आणि अविन साहू अशी या दोन सहआरोपींची नाव आहेत. या दोघांना कोर्टाने ५० हजारांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणात जामीन मंजूर झालेले हे पहिलेच दोन आरोपी आहेत.

मनिष राजघारीया आणि अविन साहू हे दोघे क्रूझवरचे प्रवासी असल्याचं सांगण्यात आलं. एनसीबीने राजघारीयाकडून 2.4 ग्रॅम गांजाही जप्त केला होता. तर अविन साहूकडून काहीही जप्त करण्यात आलं नव्हतं. कोर्टाने गेल्या आठवड्यात या दोघांच्या जामिनावरचा निर्णय राखून ठेवला होता, अशी सहआरोपी मनिष राजघारियाचे वकील अजय दुबे यांनी माहिती दिली आहे. 

न्या. व्ही. व्ही. पाटील मंगळवारी यावर सुनावणी घेतली. वकील अयाझ खान यांनी नुपूर सतलेजाच्या बाजूने युक्तीवाद केला होता. आर्यन खान, अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांच्या जामीन अर्जांवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीमध्ये आर्यन खानच्या जामीन अर्जावरची सुनावणी पूर्ण झाली असून आता अरबाज मर्चंटच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे. आज हायकोर्टाने सुनावणी तहकूब करत उद्या दुपारी याप्रकरणी सुनावणी ठेवली आहे.

टॅग्स :NCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थCourtन्यायालयArrestअटक