शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

एटीएम फोडणाऱ्या टाेळीचा छडा, दोन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 17:14 IST

Crime News : चारचाकी वाहनास सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

बुलडाणा: एकाच रात्री जिल्ह्यातील तीन एटीम फोडून त्यातील ५६ लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या टोळीचा बुलडाणा पोलिसांनी छडा लावला असून या प्रकरणात राजस्थानातून दोन जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एका चारचाकी वाहनास सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. दरम्यान याप्रकरणात आणखी सहा जण असण्याची शक्यता असून त्यांनाही लवकरच ताब्यात घेण्यात येईल, असे जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी १४ ऑगस्ट रोजी पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले आहे.

विशेष म्हणजे एटीएम फोडणाऱ्या या टोळीचा छडा लावण्याचे आव्हान बुलडाणा पोलिसांनी लिलया पेलत अशक्यप्राय वाटणारा हा गुन्हा उघडकीस आणला आहे. ३० जुलै रोजी चिखली तालुक्यातील शेलूद उंद्री आणि खामगाव तालुक्यातील पळशी बु. येथील स्टेट बँकेचे तीन एटीएम फोटून त्यातील ५६ लाख रुपयांची रोकड लंपास करत पोलिस प्रशासनासमोर आव्हान उभे केले होते. दरम्यान या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांनी सायबर सेलसह एकूण पाच पथके गठीत केली होती. गोपनीय माहिती व अमरावती परीक्षेत्र आणि मध्यप्रदेशमधील बऱ्हाणपूरपर्यंतच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासत गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेल्या वाहनाचा छडा पोलिसांनी लावला. त्यानंतर पोलिसांच्या राष्ट्रीयस्तरावरील गुन्ह्यांची माहिती देणाऱ्या व्हॉट्स अप ग्रूपवर अनुषंगीक गुन्ह्या संदर्भाने काही दुवे पोलिसांना मिळाले. त्या आधारावर गठीत करम्यात आलेल्या पाच पथकांनी तब्बल सात दिवस राजस्थानमध्ये तळ ठोकत या गुन्ह्यात वापरण्यात आलेली गाडी, गॅस सिलींडर, दोन ऑक्सिजन सिलींडर आणि सहा मोबाईल जप्त केले. सोबतच राजस्थानमधील नरेश चौधरी (रा. अजारका, जि. अल्वर) आणि आसामचा नागरिक असलेल्या परंतू अजारका परिसरातच राहणाऱ्या कमरूल इस्लाम अब्दुल गणी यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून काही हत्यारेही १० ते १२ ऑगस्ट दरम्यान जप्त केली. अटक करण्यात आलेल्या या आरोपींना १३ ऑगस्ट रोजी चिखली न्यायालयात हजर केले असता न्यायालायने त्यांची २१ ऑगस्ट पर्यंत पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नागेशकुमार चतरकर हे करीत आहेत.

 कारवाईत यांचा होता सहभाग या कारवाईत अपर पोलिस अधीक्षक बजरंग बनसोडे, हेमराजसिंग राजपूत, एसडीपीअेा दीपक बरकते, अमोल कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पीआय बळीराम गिते, सायबर सेलचे पोलिस निरीक्षक प्रदीप ठाकूर, विजय मोरे , एपीआय विलासकुमार सानप, मनिष गावंडे, पोलिस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोलिस अमलदार गजानन आहेर, शरद गिरी, पंकज मेहर, विजय सोनोने, गजानन गोरले, विजय वारूळे, शत्रुघ्न शिंदे, राजू आडवे, कैलास ठोंबरे, उषा वाघ यांनी सहभाग घेतला होता.

टॅग्स :buldhanaबुलडाणाCrime Newsगुन्हेगारी