शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ठाण्यात तिहेरी हत्याकांड! दीरासोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नीसह दोन मुलांची हत्या

By जितेंद्र कालेकर | Updated: December 21, 2023 19:26 IST

गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे.

ठाणे: दीराशी अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून पत्नी भावना अमित बागडी (२४), सहा वर्षीय मुलगी खुशी आणि आठ वर्षीय मुलगा अंकुश या तिघांची लाकडी बॅटच्या सहाय्याने अमित धर्मवीर बागडी (२९) या पतीने निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी सकाळी ७ ते ११ वाजण्याच्या दरम्यान हे हत्याकांड केल्यानंतर आरोपी अमित पसार झाला आहे. त्याच्या शोधासाठी पाच पथके नेमल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली.

आरोपी अमित आणि त्याची पत्नी भावना यांचे आठ वर्षांपूर्वीच लग्न झाले आहे. ते मुळचे हरयाणा राज्यातील खरडालीपूर (जि. इसार) येथील रहिवाशी आहेत. अमितला दारुचे प्रचंड व्यसन असल्यामुळे भावना त्याला सोडून ठाण्यातील कासारवडवली जयवंत शिंदे यांच्या चाळीत राहणारा त्याचाच सख्खा लहान भाऊ (तिचा दीर) विकास धर्मवीर बागडी याच्यासोबत गेल्या सात वर्षांपासून मुलांसह राहत होती. 

अमित कधीतरी पत्नी आणि दोन्ही मुलांना भेटण्यासाठी ठाण्यात यायचा. तसाच तो तीन दिवसांपासून ठाण्यात आला होता. मुलांना भेटण्याच्याच निमित्ताने तो भावाच्याच घरात मुले आणि पत्नीसोबत वास्तव्याला होता. नेहमीप्रमाणे त्याचा भाऊ विकास हा त्याच्या हाऊसकिपिंगच्या कामासाठी गुरुवारी (२१ डिसेंबर रोजी) सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला. 

सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास तो घरी परतला, तेव्हा त्याला घरात भावजय भावना तसेच दोन मुले ही रक्ताच्या थारोळयात मृतावस्थेत आढळली. त्यांच्या डोक्याजवळ क्रिकेटची लाकडी बॅटही होती. त्याने ही माहिती तातडीने त्याचे घरमालक जयवंत शिंदे (५०) यांना दिली. शिंदे यांनी ही माहिती पोलिसांना दिल्यानंतर वागळे इस्टेट परिमंडळ पाचचे पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, कासारवडवलीचे पोलिस निरीक्षक शशिकांत रोकडे, सहायक पोलिस निरीक्षक सुहास हटेकर आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आरोपीने मात्र तोपर्यंत तिथून पळ काढला होता.

पती-पत्नींमध्ये वादअमितचा भाऊ विकास सकाळी घराबाहेर पडल्यानंतर पती आणि पत्नींमध्ये वाद झाल्याची शक्यता आहे. पत्नी आपल्या भावाकडे वास्तव्याला असल्याची सल त्याच्या मनात होती. तर पतीच्या दारुच्या व्यसनाला पत्नी त्रासली होती. यातूनच त्यांच्यात वाद होऊन त्याने टोकाचे पाऊल उचलल्याची शक्यता आहे. मात्र, हत्याकांडाचे नेमके कारण स्पष्ट नसल्याचे कासारवडवली पोलिसांनी सांगितले. तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठिवण्यात आले आहेत.

आरोपीच्या शोधासाठी चार पथकेआरोपी अमित हा मुळचा हरियाणाचा असल्यामुळे बोरीवली, ठाणे येथील रेल्वे स्थानक त्याचबरोबर अन्यत्र शोधासाठी कासारवडवलीची दोन, चितळसरचे एक तसेच गुन्हे शाखेचे एक अशी चार पथके तैनात केल्याची माहिती पोलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांनी दिली. तिचे धाकट्या भावाबरोबर राहणे हे अमितला पटत नव्हते, त्यांच्यातील अनैतिक संबंधाचा त्याला संशय असण्याची तसेच अन्यही कारणातून ही हत्या केल्याची शक्यता वर्तविली जात आहे. आरोपीचा भाऊ विकास याच्यासह त्याच्या अन्य नातलगांकडेही याप्रकरणी चौकशी करण्यात येत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे