शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गोड-गोड बोलण्याला फसली अन् सर्वस्व लुटवून बसली! वृद्धाचा विवाहितेवर अत्याचार

By नितिन गव्हाळे | Updated: September 21, 2023 20:42 IST

६५ वर्षीय वृद्धाला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

नितीन गव्हाळे, अकोला : विवाहितेच्या परिस्थितीचा फायदा उचलून आणि तिला विविध प्रकारचे आमिषे दाखवून सातत्याने विवाहितेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या ६५ वर्षीय वृद्धाविरुद्ध रामदासपेठ पोलिसांनी मंगळवारी गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणात आरोपी वृद्धाला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली आहे. उमरी भागातील एका ३६ वर्षीय विवाहितेने दिलेल्या तक्रारीनुसार शेगाव येथील विष्णू संपाळे (६५) याने रामदासपेठ भागात एक कंपनी सुरू करून कार्यालय थाटले होते. या कंपनीमध्ये ही विवाहिता कामाला लागली होती.

कार्यालयात कोणी नसल्याचे पाहून वृद्ध तिच्याशी लगट करायचा. तिला माझे पत्नीशी पटत नाही, तिच्याकडून कोणतेही सुख मिळत नाही. असे विवाहितेला सांगायचा. विवाहितेचेसुद्धा पतीशी पटत नसल्यामुळे ती वृद्धाच्या गोड-गोड बोलण्याला फसली. वृद्धही तिला नवनवीन वस्तू खरेदी करून द्यायचा. त्यामुळे विवाहितेशी वृद्धाची जवळीक वाढत गेली. कार्यालयात कोणी नसताना तो तिच्याशी लगट करायचा. अश्लील चाळे करायचे. त्यालाही विवाहितेची मूकसंमती असायची. त्यामुळे वृद्धाची हिंमत वाढली. त्याने तिच्यावर सतत लैंगिक अत्याचार केला. विवाहितेला न सांगता, लॅपटॉपमध्ये गुपचूप व्हिडीओ काढायचा. नंतर वृद्धाची कंपनी बुडाल्यामुळे विवाहितेने नोकरी साेडली.

त्यानंतरही वृद्ध तिला संबंध ठेवण्यासाठी बळजबरी करायचा. वृद्ध घरी यायचा. व्हिडीओ, फाेटो व्हायरल करण्याची धमकी द्यायचा. वृद्धाचा त्रास असह्य झाल्याने, अखेर विवाहितेने १९ सप्टेंबर रोजी रामदासपेठ पोलिस ठाणे गाठले आणि वृद्धाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने वृद्ध विष्णू संपाळे याला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याची पोलिस कोठडीत रवानगी केली.

विवाहितेच्या घरी पोहोचवायचा वस्तू

आरोपी विष्णू संपाळे हा विवाहितेची गरज ओळखून तिच्या घरी जबरदस्तीने फ्रीज, टीव्ही, कुलरसारख्या वस्तू पाठवायचा. असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. दरम्यान, या वस्तू कोठून येताहेत? याची साधी चौकशीही विवाहितेच्या कुटुंबीयांनी केली नाही. त्यामुळे पोलिसांनीही आश्चर्य व्यक्त केले.

टॅग्स :Akolaअकोला