शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सर्पदंशावर भूमकाकडे उपचार, मेळघाटातील आदिवासी महिलेचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2021 21:44 IST

मेळघाटात अंधश्रद्धेने घेतला महिलेचा बळी : डॉक्टरांकडून प्रयत्नांची शर्थ

चिखलदरा (अमरावती) : रात्री परिवारासह घरात असताना महिलेला सर्पदंश झाला. उपचारासाठी नजीकच्या गावात मांत्रिकाकडे नेण्यात आले. प्रकृती खालावल्यानंतर टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. डॉक्टरानी प्रथमोपचार करून उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. तेथून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. मेळघाटात पुन्हा अंधश्रद्धेने एका आदिवासी महिलेचा बळी घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला.

फुलवंती शालिकराम कासदेकर (३०, रा. जामली आर) असे मृताचे नाव आहे. तिला मुलगा, मुलगी आहे. शनिवारी रात्री झोपेत तिला सर्पदंश झाला. काहीतरी चावले म्हणून सर्व जण खडबडून जागे झाले. टेम्ब्रुसोंडा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर अचलपूर येथे वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.

सापाचा शोध, नंतर भूमकाचे दारफुलवंती कास्‍देकर यांना सर्पदंश झाल्याने कुटुंबीयांनी सर्वप्रथम सापाचा शोध घेतला. त्यानंतर काही वेळाने नजीकच्या खोंगडा, अंबापाटी येथील भूमकाकडे नेले. दोन ते तीन तास तेथे उपचार केल्यानंतर प्रकृती खालावल्याने टेंब्रुसोंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पहाटे ३ वाजता आणण्यात आले. डॉ. चंदन पिंपरकर यांनी उपचार करून ३.३० वाजता उपजिल्हा रुग्णालय अचलपूर येथे पाठविले, परंतु उपजिल्हा रुग्णालयातसुद्धा अतिदक्षता विभाग नसल्याने तिला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. वाटेत आसेगावनजीक तिचा मृत्यू झाला.अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर उपचार करण्यात आले. प्रकृती अत्यंत खालावल्यामुळे व येथे अतिदक्षता विभाग नसल्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आले.- सुरेंद्र ढोले, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, अचलपूर

टॅग्स :snakeसाप