शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विरारच्या तरुण दांपत्याची शोकांतिका; पतीच्या मृत्यूनंतर २२ वर्षीय पत्नीची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 16:20 IST

Virar : काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती.

नालासोपारा : विरारमध्ये राहणाऱ्या दांपत्यापैकी नवऱ्याचा मंगळवारी रात्री मृत्यू झाल्यानंतर घाबरलेल्या पत्नीने बुधवारी पहाटे गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विरार पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवून अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

काही दिवसांपूर्वी नवापूर येथे वडिलांचा मृत्यू झाल्यानंतर मुलीने आत्महत्या केली होती. त्याचप्रमाणे ही घटना घडली असून नवापूरची पुनरावृत्ती असल्याची विरारमध्ये चर्चा सुरू आहे. मनवेल पाडा येथील दादूस क्लासिक या इमारतीमध्ये नरेंद्रसिंह परमार (२४) आणि त्याची पत्नी संतोष परमार (२२) हे दोघेच भाड्याने राहत होते. या दोघांचे अडीच वर्षांपूर्वी लग्न झाले होते व मूलबाळ नव्हते. काही दिवसांपूर्वी संतोषचा लहान भाऊ यांच्यासोबत राहण्यासाठी आला होता.

नरेंद्रसिंहच्या पोटात मंगळवारी संध्याकाळी खूप दुखत असल्याने त्याला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात नेले व नंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तो घरी आला. परत पोटात दुखत असल्याने पत्नीने त्याला इनो दिला, पण काही उपयोग झाला नाही व त्याचा मृत्यू झाला. पतीचा मृत्यू झाल्याचे पाहून पत्नी संतोष घाबरली आणि तिने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. तिचा लहान भाऊ बुधवारी सकाळी कामावरून आल्यावर दरवाजा उघडा नसल्याचे त्याने पाहिले.

दरवाजा उघडल्यावर बहिणीने गळफास घेतलेला मृतदेह तर भाऊजीचा मृतदेह त्याने पाहिल्यावर विरार पोलिसांना घटनेची माहिती दिली. विरार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत.

टॅग्स :Virarविरार