शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

इन्शुरन्सच्या १ कोटी विम्यासाठी युवकाचा कांड; 'असा' बनाव रचला की पोलीसही हैराण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2024 10:32 IST

फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले.

तामिळनाडू इथं मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात चेंगलपेट परिसरात लागलेल्या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. पोलिसांनी या घटनेची अपघाती नोंद करून जवळपास फाईल बंदच केली होती. परंतु काही दिवसांनी पोलिसांना अशी माहिती मिळाली ज्यामुळे पोलिसांनी नव्यानं याचा तपास सुरू केला आणि पोलिसांच्या तपासात जे काही समोर आले त्याने पोलीस हैराण झाले. ज्या व्यक्तीचा आगीत मृत्यू झाल्याचं नोंद केले होते. तो चक्क जिवंत असल्याचं तपासात समोर आले. स्वत:च्या मृत्यूचा बनाव रचण्यासाठी त्याने मित्राची हत्या केली होती.

काय आहे प्रकरण?सुरेश आर नावाचा एका युवक चेन्नईमध्ये राहून जिममध्ये फिजिकल ट्रेनरचे काम करायचा. मागील काही दिवसांपूर्वी तो चेन्नईतून परतून चेंगलपेटच्या अल्लानूर इथं राहायला आला. १६ सप्टेंबरला सुरेश ज्या घरात राहायचा तिथे आग लागली. या आगीत एका व्यक्तीचा मृत्यू झाला. ज्याला तो सुरेश असल्याचं त्याच्या आईने सांगितले. परंतु मृत युवक सुरेशच आहे हे मानायला पोलीस तयार नव्हती. मग डिसेंबरमध्ये पोलिसांना सुरेश जिवंत असल्याची माहिती मिळाली. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे.

सुरेशचा मृत्यू झाल्यापासून मित्र बेपत्ता तपासादरम्यान पोलिसांना कळले की, सुरेशचा एक मित्र दिल्ली बाबू (वय ३९ वर्ष) सुरेशच्या मृत्यूपासून बेपत्ता होता. बाबूच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. यावरून पोलिसांना बाबूचा मोठा भाऊ पलानी याच्याकडून माहिती घेतली असता दिल्ली बाबू अनेकदा सुरेशच्या घरी जात असे आणि दोघेही मित्र होते असं कळाले. याबाबत पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सुरेश आणि दिल्लीच्या मित्राच्या चौकशी केली असता सुरेशच्या घराला आग लागली तेव्हा दिल्ली बाबूही त्याआधी त्याच ठिकाणी दिसला होता.

'असा' केला पोलिसांनी खुलासा दरम्यान, सुरेशला कोणीतरी पाहिल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तपासादरम्यान पोलिसांना हरिकृष्ण हा सुरेशचा जवळचा मित्र असल्याची माहिती मिळाली. यावर पोलीस वेल्लोर येथील हरिकृष्णाच्या घरी पोहोचले, तिथे पोलिसांना हरिकृष्णाच्या वडिलांचा फोन नंबर मिळाला. या फोन नंबरच्या मदतीने पोलीस वेल्लोरच्या अरक्कोनम भागात हरिकृष्णाच्या लपलेल्या ठिकाणी पोहोचले. पोलीस हरिकृष्णाच्या खोलीत पोहोचले तेव्हा हरिकृष्णासोबत सुरेशही तेथे आढळून आला.

यानंतर पोलिसांनी सुरेशची चौकशी केली असता सुरेशने स्वतःचा एक कोटी रुपयांचा विमा काढल्याचे समोर आले. ही विम्याची रक्कम मिळवण्यासाठी त्याने दिल्ली बाबूला मारून त्याच्या मृत्यूचा बनाव रचला जेणेकरून विमा म्हणून एक कोटी रुपये मिळावेत. या कामात सुरेशला हरिकृष्ण आणि गावातील आणखी एक मित्र कीर्ती रंजन यांचीही साथ मिळाली. सध्या पोलिसांनी तिघांनाही अटक करून तुरुंगात पाठवले आहे.