शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

थरारक पाठलाग: शस्त्राने वार, गोळीबार,चौघे पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 18:21 IST

अहमदनगर : दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करणाºया पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केल्याने एक पोलीस जखमी झाला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार आरोपी जखमी झाले. सोमवारी पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान दरोडेखोर व पोलिसांमधील हा थरार रंगला. पोलिसांनी पाठलाग व नाकाबंदी करून चार दरोडेखोरांना जेरबंद केले.

ठळक मुद्देलोणी-श्रीरामपूर रस्त्यावर सोमवारी रंगला थरार
अहमदनगर : दरोडेखोरांचा थरारक पाठलाग करणाºया पोलिसांवर धारदार शस्त्राने वार केल्याने एक पोलीस जखमी झाला. तर पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात चार आरोपी जखमी झाले. सोमवारी पहाटे ३ ते ५ वाजेच्या दरम्यान दरोडेखोर व पोलिसांमधील हा थरार रंगला. पोलिसांनी पाठलाग व नाकाबंदी करून चार दरोडेखोरांना जेरबंद केले.तौफिक सत्तार शेख (वय ३१, रा. प्रभाग १, श्रीरामपूर), राहुल विलास शेंडगे (वय १९, रा. अशोकनगर, निपाणीवडगाव, ता. श्रीरामपूर) यांना पिंप्री निर्मळ गावाजवळील डाळिंबाच्या बागेत मोठ्या शिताफीने पकडले. पोलिसांनी स्वसंरक्षणार्थ केलेल्या गोळीबारात राहुल शेंडगे हा जखमी झाला. त्याच्याबरोबर झटापटीत तौफिक शेख हा देखील जखमी झाला. या दोघांना लोणीच्या प्रवरा ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. रविवार २७ आॅगस्टला रात्री ११ वाजेच्या सुमारास दत्तनगर (श्रीरामपूर )येथील संतोष पवार व त्याच्या घराजवळ तौफिक शेख, राहुल शेंडगे, गौरव बागुल व किरण काकफळे हे आरोपी गांजा पित बसले होते. तेव्हा पवारने हरकत घेतली. तेव्हा पवार यांनी हरकत घेत विचारणा केल्याने आरोपींनी घरात घुसून पवार व त्याच्या कुटुंबियांना शस्त्राचा धाक दाखवून काठीने व कत्तीने मारहाण करुन जखमी केले. तसेच घरातील दूरचित्रवाणी संच,रोख रक्कम व दागिने लुटून आरोपी पसार झाले. त्यानंतर या दरोडेखोरांनी श्रीरामपूर ते लोणी रस्त्यावर आयशर वाहन ((क्रमांक एम. एच.१५ई जी ५३९३) व छोटा हत्ती वाहन (क्रमांक एम. एच. १७ बी डी २२२९)या दोन वाहनांना अडवून त्यातील लोकांना कत्तीने मारहाण करून जखमी करून त्यांच्याकडील मोबाईल, ए.टी.एम. कार्ड व रोख रक्कम असे जबरीने चोरून नेले. या रस्ता लुटीची माहिती लोणीचे सहायक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांना मिळताच त्यांनी पहाटे ३ वाजेच्या सुमारास राजुरी, ममदापूर येथे पोलीस व ग्रामस्थांच्या मदतीने नाकेबंदी करुन आरोपींना अडविण्याचा प्रयत्न केला. ............................चार आरोपींना अटकतौफिक सत्तार शेख (वय ३१, रा. श्रीरामपूर), राहुल विलास शेंडगे (वय १९, रा. अशोकनगर, श्रीरामपूर), गौरव रवींद्र बागुल व किरण सुरेश काकफळे (सर्व रा. श्रीरामपूर) या चार जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाठलाग करून अटक केली.