शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

बारावीतील मुलीचे चुंबन घेणाऱ्यास 3 वर्षांचा सश्रम कारावास; दंडही ठोठावला

By महेश सायखेडे | Updated: May 23, 2023 15:12 IST

दंडही ठोठावला : वर्धा येथील जिल्हा न्यायालयाचा निर्वाळा

महेश सायखेडे

वर्धा : बारावीचे शिक्षण घेणारी मुलगी घरी एकटी असल्याचे हेरून तिला घट्ट पकडत थेट चुंबन करणाऱ्यास दंडासह तीन वर्षांच्या सश्रम करावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल वर्धा येथील अतिरिक्त विशेष जिल्हा न्यायाधीश-१ व्ही. टी. सूर्यवंशी यांनी मंगळवारी दिला. मनोज रघुनाथ गोडाले असे या प्रकरणातील शिक्षेस पात्र ठरलेल्या आरोपीचे नाव असून तो देवळी तालुक्यातील रहिवासी आहे.

न्यायाधीश सूर्यवंशी यांनी मनोज गोडाले यास बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ८ नुसार तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास. भादंविच्या कलम ३५४ अन्वये तीन वर्षांचा सश्रम कारावास व तीन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त तीन महिन्यांचा साधा कारावास. तर भादंविच्या कलम ४५१ नुसार एक वर्षांचा सश्रम कारावास व एक हजारांचा दंड तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त एक महिन्यांचा कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या प्रकरणी न्यायालयात शासकीय बाजू ॲड. विनय आर. घुडे यांनी मांडली.

मामाच्या घरी राहून पीडिता घेत होती बारावीचे शिक्षण

घटनेच्या वेळी पीडिता ही मामाच्या घरी राहून बारावीचे शिक्षण घेत होती. १२ सप्टेंबर २०१८ ला रात्री १०.३० वाजताच्या सुमारास पीडितेची आजी-आजोबा पोथी ऐकण्यासाठी तर मामा फिरण्यासाठी घराबाहेर पडले होते. अशातच पीडिता ही घरी एकटी असल्याचे हेतूने मनोज याने पीडितेच्या घरात प्रवेश केला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने घरात एकटी असलेल्या पीडितेला घट्ट पकडून तिच्या गालाचे चुंबन घेत तिचा विनयभंग केला.बॉक्स

स्वत:ला सावरत मामाला सांगितली आपबिती

घरी एकटी असलेल्या पीडितेने मोठा धाडस करीत जोराचा धक्का देत आरोपीला घराबाहेर काढून घराचे दार बंद केले. थोड्यावेळानंतर पीडितेचा मामा घरी आल्यावर पीडितेने स्वत:ला सावरत तिच्यासोबत घडलेल्या घटनेची माहिती मामाला दिली. संबंधित प्रकार गंभीर असल्याने पीडितेच्या कुटुंबियांनी पुलगाव पोलीस स्टेशन गाठून तक्रार नाेंदविली.

चार साक्षदारांची तपासली साक्ष

संबंधित प्रकरणी तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. या प्रकरणाचा तपास पुलगाव पोलीस ठाण्यातील तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक चेतन मराठे यांनी पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. या प्रकरणी शासनातर्फे एकूण चार साक्षदारांची साक्ष न्यायालयात तपासण्यात आली. पैरवी अधिकारी म्हणून सहा. फौजदार अनंत रिंगणे यांनी काम पाहिले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद आणि पुरावे लक्षात घेऊन न्यायाधीश सूर्यवंशी यांनी मनोज रघुनाथ गोडाले यास दोषी ठरवून शिक्षा ठोठावली.

 

टॅग्स :wardha-acवर्धाCrime Newsगुन्हेगारीCourtन्यायालयPoliceपोलिस