शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

उमरगा येथे तीन वर्षीय चिमुकलीचा खून ; तेरणा नदीपात्राशेजारी आढळला मृतदेह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 17:32 IST

तेरणा नदीपात्राशेजारी आज दुपारी एका तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे़  

उमरगा (उस्मानाबाद) : लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या तेरणा नदीपात्राशेजारी आज दुपारी एका तीन वर्षीय अनोळखी बालिकेचा मृतदेह आढळून आला आहे़  तिच्या अंगावर मारहाणीचे व्रण असल्याने खून झाल्याचे स्पष्ट होत आहे़

उमरगा ते लातूर जाणाऱ्या राज्यमार्गाजवळील कवठा गावाजवळ तेरणा नदीपात्राशेजारी एका बालिकेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पहिल्यांदा किल्लारी पोलिसांना मिळाली़ त्यांनी घटनास्थळी धाव घेत ही माहिती उमरगा पोलिसांना कळविली़  यानंतर उमरगा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे़ मृतदेह उमरग्याच्या उपजिल्हा रुग्णालयात विच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे़

दरम्यान, मयत बालिकेच्या अंगावर ठिकठिकाणी मारहाणीचे व्रण आढळून आले आहेत़ शिवाय, मृतदेह अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे़ यावरुन त्या बालिकेचा शारीरिक अत्याचार करुन खून झाला असावा, असा संशय पोलिसांना आहे़ मात्र, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समोर येईल, असे उमरगा पोलिसांनी सांगितले़ तसेच सध्या पोलीस तिची ओळख पटविण्यासाठी प्रयत्नशील आहेत़