शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

मीरा-भाईंदरसह मुंबई, भिवंडीत धुमाकूळ घालणाऱ्या तीन चोरांना अटक

By धीरज परब | Updated: May 16, 2023 23:28 IST

२७ मोबाईल व चोरीची रिक्षा जप्त

धीरज परब, लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड: मीरा-भाईंदर सह मुंबई, भिवंडी आदी भागातील बस प्रवाशांचे तसेच वाटसरूंचे मोबाईल चोरणाऱ्या अट्टल चोरट्यांना काशिमिरा पोलिसांनी अटक केली आहे . त्यांच्याकडून चोरीचे २७ मोबाईल व एक रिक्षा जप्त करण्यात आली आहे अशी माहिती पोलिस उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.  

काशीमीरा पोलीस ठाणे हदीत देव गोपी शर्मा (३०) रा.  न्यु समीर, जेसल पार्क, भाईंदर पूर्व हे रात्री डॉन बॉस्को शाळेकडे जाणा-या वळणावर आले असता रिक्षामधुन आलेल्या ३ इसमांनी येवुन शर्मा यांना, सही है वो असे बोलून त्यांच्या गालावर चापट मारली आणि खिशातील मोबाइल जबरीने चोरी करून पळाले होते. काशीमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

 सहायक आयुक्त विलास सानप यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम, निरीक्षक कुमारगौरव धादवड , सहायक पोलीस निरीक्षक  प्रशांत गांगुर्डे, उपनिरीक्षक निखिल चव्हाण व प्रकाश काबरे सह सचिन हुले, सुधीर खोत, राहुल सोनकांबळे,  रविंद्र कांबळे, प्रविण टोबरे तसेच उपायुक्त कार्यालयातील  जयप्रकाश जाधव  यांनी गुन्ह्याचा तपास चालवला होता. 

 प्रशांत गांगुर्डे  व पथक यांना वेर्स्टन हॉटेलकडुन हाटकेश कडे जाणाऱ्या रस्त्यावर एक रिक्षा व त्यातील तिघेजण संशयास्पद रित्या आढळून आले. पोलिसांनी पाठलाग करून रिक्षा व त्यातील तिघांना पकडले. ते तिघेही भिवंडी चे राहणारे आहेत. इरशाद अब्दुल रौफ अन्सारी (३०) रा. नालापार्क, दिवानशहा दर्गाच्या मागे;  मोहसीन मेहमूद खान (२६) रा. जैतुनपुरा, कॉटरगेट मस्जीदच्या मागे व शाहीद अख्तर अन्सारी (२७) रा. जैतुनपुरा, मंगलबजार स्लॅब, एकता हॉटेलच्या समोर अशी त्यांची नावे आहेत. 

रिक्षाच्या तपासणीत प्रवासी सिटच्या मागे एक काळया रंगाच्या बॅगेत विविध कंपन्याचे २७ मोबाईल सापडले. त्या मध्ये शर्मा यांचा लुटलेला मोबाईल देखील सापडला. तर रिक्षा देखील इरशाद व  मोहसीन यांनी काशीमीरा भागातून चोरलेली होती. पोलिसांनी तिघांना अटक करून २७ मोबाईल, रिक्षा असा ३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 

अटक शाहिद हा रिक्षा चालक, मोहसीन हा हमाल तर इरशाद मेस्त्री काम करत असल्याचे सांगत असले तरी ते सराईत चोरटे आहेत. त्यांच्यावर पूर्वीचे ११ गुन्हे दाखल असून पोलीस जप्त मोबाईल मालकांचा शोध घेत आहेत.  मीरा भाईंदर सह घोडबंदर ते अंधेरी, मुलुंड, भिवंडी आदी भागात बस मधील प्रवासी तसेच वाटसरुं चे मोबाईल चोरत असत. आरोपीं कडून आणखी अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी