शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

भिवंडीत तीन मोटरसायकल चोरट्यांना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2020 18:10 IST

नारपोली पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील तीन वाहनांचा शोध घेतला असून याप्रकरणी तीन वाहन चोरट्यांना अटक करण्यात आली

भिवंडी : भिवंडीत वाहन चोरांनी थैमान घातला असल्याने वारंवार होणाऱ्या वाहन चोरीच्या घटनांनी वाहन चालक हिरं झाले होते . रोजच्या वाहन चोरीच्या घटनांना आळा बसावा यासाठी भिवंडी परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी शहरातील सहाही पोलीस ठाण्यांना वाहन चोरांच्या मुसक्या आवळण्याचा अदेश दिले होते.

त्यांनतर नारपोली पोलिसांनी वाहन चोरी प्रकरणातील तीन वाहनांचा शोध घेतला असून याप्रकरणी तीन वाहन चोरट्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शुक्रवारी नारपोली पोलिसांनी दिली आहे . दर्शक कीर्ती हरनिया ( वय 23 रा .अंजूरफाटा ) यांची शाईन मोटर सायकल चोरी झाली होती याप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता . नारपोली पोलिसांनी तपास करून आरोपी इस्तियाक लियाकत अली अंसारी उर्फ पंजाबी ( वय 35 ) यास अटक करून चौकशी केली असता सदर मोटर सायकल त्याने काल्हेर येथून चोरी केल्याची कबुली दिली आहे . दुसऱ्या घटनेत फिरोज इब्राहिम शेख ( 27 ) यांची ऍक्टिव्हा दुचाकी चोरीला गेली होती . याप्रकरणी अन्वर मुक्तार सय्यद ( 22 रा . साकीनाका मुंबई ) यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली आहे.

तर तिसऱ्या घटनेत सत्यवान बबन शेट्ये ( 45 ) यांची रजिस्टर न झालेली नवीन मोटर सायकल चोरीला गेली होती सदर गाडी चोरी प्रकरणी आरोपी सैफ जलालुद्दीन अंसारी ( 21 रा . जैतुनपुरा ) यास अटक केल्या नंतर त्याने वाहन चोरीची कबुली दिली आहे . विशेष म्हणजे या तिन्ही मोटर सायकल या तीनही चोरट्यांकडून पोलिसांनी हस्तगत केल्या असल्याची माहीती नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे यांनी दिली आहे .