शहरं
Join us  
Trending Stories
1
Gopal Badane : "मला निष्कारण अडकवलं जातंय"; निलंबित पीएसआय गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया
2
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान 'दहशतवादी'...! पाकिस्तानची कारवाई, 'शाहबाज' सरकार बिथरलं; नेमकं काय घडलं?
3
'भारताने रशियन तेल आयात पूर्णपणे थांबवली', डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा केला दावा...
4
लेकीच्या लग्नासाठी बापाने जमवले ५ लाख; नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू, वरातीऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
भुरटा नाही, अट्टल गुन्हेगार; ऑस्ट्रेलियन खेळाडूंची छेड काढणाऱ्या अकील खानची क्राइम कुंडली समोर
6
Video: शत्रुंजय टेकडीवर जंगलाच्या 'राजा'चा मुक्त वावर; सिंह दिसताच पर्यटक घाबरुन पळाले...
7
निवृत्तीनंतरही कर्ज मिळवणं सोपं! 'या' ३ महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, बँक लगेच देईल लोन
8
पंकजा मुंडेंनी घेतली मयत डॉ. संपदा मुंडेंच्या कुटुंबीयांची भेट; मुख्यमंत्र्यांकडे केली 'ही' मागणी...
9
अखेर तारीख जाहीर! 'या' दिवशी येणार Lenskart चा IPO; ₹7278 कोटी उभारण्याची योजना...
10
शौर्याची गाथा निळ्या समुद्राखाली विसावणार, INS गुलदारचे रुपांतर देशाच्या पहिल्या पाण्याखालील संग्रहालयात
11
सोन्याच्या दरात मोठी घसरण! फक्त ४ दिवसांत ७,००० रुपयांहून अधिक स्वस्त; काय आहे कारण?
12
RO-KO च्या चाहत्यांसाठी खुशखबर! पुढील वनडे कधी खेळणार? जाणून घ्या तारीख...
13
समर्थक जिंदाबादच्या घोषणा देत असताना स्टेज कोसळला; बाहुबली नेते अनंत सिंह पडले खाली
14
भीषण, भयंकर, भयावह! रशियाचा युक्रेनवर मोठा ड्रोन अटॅक; ४ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
"साताऱ्यातील आरोपीला गोळ्या घाला"; आरजी कर प्रकरणातील पीडितेच्या वडिलांची मोठी मागणी
16
"मी १० महिन्यांत १० दिवसही आनंदी नव्हती..."; पतीवर गंभीर आरोप करत महिलेने संपवलं आयुष्य
17
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
18
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
19
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
20
IND W vs BAN W Live Streaming : कुठं आणि कसा पाहाल भारत-बांगलादेश यांच्यातील सामना?

मीरारोड टोरेस फसवणूक प्रकरणात तिघांना अटक; २६ लाखांची रक्कम हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 21:53 IST

पोलिसांनी लखवानी व शेख ह्या दोघांकडून  २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे

धीरज परब

मीरारोड - मीरारोडच्या रामदेव पार्क भागातील टोरेस ज्वेलरी फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल केल्या नंतर नवघर पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे . 

रामदेवपार्कच्या अनंता एक्झोरिया इमारतीत भाड्याने उघडलेले टोरेस ज्वेलरी शोरूम फसवणूक प्रकरणी सोमवार ६ जानेवारी रोजी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरु केला.  कंपनीची बँक खाती व त्यातील ९ कोटी २४ लाखांची रक्कम गोठवण्यात आल्याचे सांगण्यात आपले . गुरुवारी पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड , वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी आदींनी शोरुमची पाहणी करून पोलिसांनी पंचनामा केला होता . उपनिरीक्षक संदीप व्हस्कोटी गुन्ह्याचा तपास करत आहेत.

मीरारोड टोरेस शोरुमची जागा ज्या तरुणीच्या नावाने भाड्याने घेण्यात आली होती त्या लक्ष्मी सुरेश यादव ( २३ ) हिला ताडदेव येथून अटक केली . तर शाखेचा व्यवस्थापक नितीन लखवानी ( ४७ ) रा . मालाड पश्चिम आणि रोखपाल मोहम्मद मोईजुद्दीन खालिद शेख ( ५० ) रा . मीरारोड ह्या दोघांना सुद्धा अटक केली गेली आहे . तिघांना शुक्रवारी ठाणे न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे . 

पोलिसांनी लखवानी व शेख ह्या दोघांकडून  २६ लाख २० हजार रुपयांची रक्कम हस्तगत केली आहे . गुरुवार पर्यंत फसगत झालेल्या तक्रारदारांची संख्या ७६ इतकी झाली असून फसवणुकीची रक्कम १ कोटी ७ लाख रुपये पर्यंत गेली आहे. फसगत झालेले लोक जसे येतील तसे त्यांची तक्रार घेतली जात आहे असे उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी सांगितले . 

मोजोनाईट स्टोन कित्येक पटीने महाग विकून ते खरेदी करणाऱ्यांना दर आठवड्याला बक्कळ बोनस चे आमिष दाखवत मीरारोडच्या शाखेत शेकडो लोकांची फसवणूक केली गेली आहे . फसगत झालेल्या लोकांची संख्या व फसवणुकीची रक्कम वाढत  असून आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त फसगत झालेले लोक समोर आले आहेत . त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे असे पोलीस सूत्रांनी सांगितले .

टॅग्स :fraudधोकेबाजी