शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

एटीएम कॅश व्हॅन लूटप्रकरणी तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2020 23:48 IST

२५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी : रकमेसह मुद्देमाल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनालासोपारा : सव्वाचार कोटींची कॅश असलेली व्हॅन घेऊन पळालेल्या गुन्ह्याचा अखेर उलगडा झाला असून तीन आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी गुन्ह्यातील ४ कोटी २३ लाख २९ हजारांची रक्कम जप्त केली आहे. आरोपींनी विकत घेतलेली बुलेट, मोबाईलही पोलिसांनी जप्त केले आहेत. पकडलेल्या आरोपींना २५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला विरारच्या बोळिंज येथून महिंद्रा कोटक बँकेच्या एटीएममध्ये पैसे भरणारी कॅशव्हॅन आरोपी ड्रायव्हरने पळवून नेत सव्वाचार कोटींची चोरी केल्याची धक्कादायक घटना घडली होती. पोलिसांनी ड्रायव्हर रोहित बबन आरू (२४), अक्षय प्रभाकर मोहिते आणि मुख्य आरोपीला राहण्यासाठी व पैसे ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या चंद्रकांत ऊर्फ बाबूशा गायकवाड (४१) या तिघांना अटक केली आहे. अक्षयवर चेंबूर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल आहे. मुख्य आरोपी याच्यावर मुंबई, ठाणे किंवा आजूबाजूच्या परिसरातील कोणत्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत का, याची चौकशी केली जात असल्याचे डीसीपी संजयकुमार पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

दोन्ही आरोपींनी गांजा पिताना चेंबूरच्या पार्किंग लॉटमध्ये प्लॅन आखला होता. मुख्य आरोपीला वडील नसून तीन भाऊ असल्याने त्याला पैशांची चणचण होती. त्यामुळे ही चोरी केली होती. तसेच तो लेह लदाख किंवा जम्मू काश्मीरमध्ये सेटल होणार असल्याचे चौकशीत समोर आल्याचे काशिमीरा क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी सांगितले. पोलिसांनी तिन्ही आरोपींकडून ४ कोटी २८ लाख ७० हजार १०० रुपयांची रोख रक्कम, १ लाख ४० हजारांची बुलेट आणि १० हजारांचा मोबाईल जप्त केला आहे. ज्या मित्रांना या प्लॅनची माहिती दिली होती त्यांना साक्षीदार करणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.