शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीसोबत अनैसर्गिक कृत्य करून दिली जीवे मारण्याची धमकी; भोंदूबाबासह एकाविरूद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2018 14:30 IST

जादूटोण्याच्या नावाखाली उपचाराच्या बहाण्याने एका मुलीवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना कळमनुरी येथे उघडकीस आली आहे.

ठळक मुद्दे याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याला मदत करणाऱ्या एका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

कळमनुरी (हिंगोली ) : ‘तुझ्यावर कोणीतरी करणी केली असून उपचार करावे लागतील, नाहीतर तुझा जिवही जाऊ शकतो’ असे म्हणत जादूटोण्याच्या नावाखाली उपचाराच्या बहाण्याने एका मुलीवर अनैसर्गिक कृत्य केल्याची खळबळजनक घटना कळमनुरी येथे उघडकीस आली. याप्रकरणी भोंदूबाबा आणि त्याला मदत करणाऱ्या एका विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सविस्तर माहिती अशी की, अकोला येथील एका १७ वर्षीय मुलीस दोन इसमांनी ‘तुझ्यावर जादूटोणा करून करणी केली आहे, त्यामुळे बाहेरचा इलाज करावा लागेल’ इलाज केला नाही तर जीवही जाऊ शकतो असे म्हणून २१ जून २०१८ रोजी कळमनुरी येथील शेतशिवारात आणले होते. इलाज करण्याच्या नावाखाली आरोपी शेख कौसर शेख अफसर याने मुलीसोबत बळजबरी करून अनैसर्गिक कृत्य केले. तसेच त्याचे चित्रीकरण केले. यानंतर अनैसर्गिक कृत्याचे चित्रिकरण पसरविण्याची धमकी देवून शेख कौसर हा पीडित मुलीकडे वेळोवेळी पैशाची मागणी करू लागला. तसेच याची बाहेर वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली.  वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर मुलीने याप्रकरणी कळमनुरी ठाण्यात तक्रार दाखल केली. 

पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शेख कौसर शेख अफसर व हे कृत्य करण्यास आरोपीला मदत करणाऱ्या वाहनचालक शेख चाँद दोघे रा. सावरखेडा जिल्हा बुलढाणा या दोघांविरूद्ध कलम ३७६, ३७७, ३८४, ५०६, ३४, भादंवि सहकलम ४, ६, १४ बाललैंगिक अत्याचार कायदा अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि आडे करीत आहेत.

टॅग्स :Rapeबलात्कारHingoli policeहिंगोली पोलीसCrimeगुन्हा