शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

अंबानी-अमिताभ-धर्मेंद्रचे घर उडविण्याची धमकी; निनावी फोन, मुंबई पोलिसांचा दुजोरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 06:27 IST

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या संदर्भातील फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर/मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी, चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांचे घर उडविण्याची धमकी देण्याचा फोन नागपूर पोलिसांना आल्याची चर्चा पसरल्यामुळे सुरक्षा यंत्रणांमध्ये खळबळ उडाली होती. नागपूर पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला या संदर्भात फोन आला होता. त्यानंतर, तातडीने याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आल्याचा दावा करण्यात येत होता. नागपुरातील पोलिस अधिकाऱ्यांनी असे काही झाले नसल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात ११२ या क्रमांकावर नवी मुंबईतील नियंत्रण कक्षात थेट फोन गेल्याचा दावा काही सूत्रांनी केला आहे. 

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी या संदर्भातील फोन आल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. नागपूर नियंत्रण कक्षाला फोन आल्याचा दावा मुंबईतील अधिकाऱ्यांनी केला. मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेले ॲंटिलिया, तसेच अमिताभ बच्चन यांचे निवासस्थान बॉम्बने उडविण्याची त्याने धमकी दिली. या व्हीआयपी व्यक्तींच्या घरासमोर बॉम्ब लावण्यात आले असून, त्याचप्रमाणे मुंबईतील दादरमध्ये शस्त्रास्त्रांसह २५ दहशतवादी शिरल्याचा दावा करण्यात आला. नागपूर पोलिस दलाच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त मुमक्का सुदर्शन यांनी मात्र असे काही झाले नसल्याची माहिती दिली. 

परंतु मुंबईतील उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ११२ या पोलिस तक्रार क्रमांकाचा केंद्रीय नियंत्रण कक्ष नवी मुंबई येथे आहे. त्यामुळे तेथेच थेट संबंधित फोन गेला व तो ‘ट्रेस’ झाल्यानंतर त्याची माहिती नागपुरातील काही अधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

निवासस्थानांच्या सुरक्षेत वाढमुंबईत अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्यामुळे सुरक्षा यंत्रणांनी या धमकीला गंभीरतेने घेतले आहे. मुकेश अंबानी यांच्या ॲंटालियासह अमिताभ बच्चन व धर्मेंद्र यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याशिवाय बॉम्बशोधक पथकेदेखील पाठविण्यात आली.

टॅग्स :Mukesh Ambaniमुकेश अंबानीAmitabh Bachchanअमिताभ बच्चन