शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

ड्रगच्या कारभाराचे धागेदोरे अमृतसर, पाकिस्तानपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2020 02:51 IST

अमेरिका, ब्रिटन, कॅनडाकडे मागितली मदत

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : अमली पदार्थ नियंत्रण विभागाने (एनसीबी) अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणी ड्रगच्या पैलूने केल्या जात असलेल्या चौकशीतून ड्रगच्या कारभाराचे धागेदारे अमृतसर आणि पाकिस्तानमधील अमली पदार्थाचा कारभार करणाऱ्या टोळ्यांपर्यंत पोहोचले आहेत. ग्राहक ते ड्रग विक्रेते आणि पुरवठादारांसह ड्रगच्या कारभारात कोण आहेत, याचा शोध एनसीबी घेत आहे. बॉलीवूडमधील पूर्वीच्या आणि आजच्या प्रसिद्ध व्यक्तीही एनसीबीच्या चौकशीच्या घेºयात येण्याची शक्यता आहे.

चौकशीशी संबंधित एनसीबीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, बॉलीवूडमधील ड्रगच्या कारभारात आणि मुंबईत ड्रगचा पुरवठा करणारे कोण आहेत, याचा अंदाज आला आहे. हेरॉईन, कोकेन आणि अन्य अमली पदार्थाचे ग्राहक आणि त्यांना अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्यांवर आरोप ठेवण्यासाठी ठोस पुरावे गोळा केले जात आहेत. ड्रगच्या कारभाराशी संबंधित अमृतसरमधील एका व्यक्तीला एनसीबी पाचारण करण्याची शक्यता आहे. मुंबईतील कोकेनचा पुरवठा करणाºयांचा छडा लावण्यासाठी एनसीबीने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा आणि आॅस्ट्रेलियाच्या अमली पदार्थाविरोधी संस्थाचीही मदत मागितली आहे. सहयोगी संस्थांकडून मिळालेल्या माहितीनुसार २०१८ मध्ये भारतात १,२०० किलोग्रॅम कोकेन आले होते. यापैकी ३०० किलोग्रॅम कोकेन मुंबईत पोहोचले होते. जून २०१९ मध्ये आॅस्ट्रेलियात ५५ किलो कोकेन जप्त करण्यात आले होते. याप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीतून उपरोक्त माहिती उघड झाली. आॅस्ट्रेलियाच्या माहितीच्या आधारे एनसीबीने गुन्हा दाखल केलेला आहे.

कोलंबिया-ब्राझील आणि मोझाम्बिकमार्गे भारतात कोकेन आले. यासाठी आफ्रिका आणि दुबईतून काही ठिकाणांचा पर्यायी मार्ग म्हणून वापर करण्यात आला. भारतात मोठ्या प्रमाणावर पोटॅशियम परमँग्नेट उत्पादन केले जाते. त्याचा वापर कोकेन प्रकियेत केला जातो. 

टॅग्स :Drugsअमली पदार्थ