शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ गुंतवणूकदारांना मिळाले दोन कोटी परत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 07:15 IST

एस. कुमार ज्वेलर्स ॲन्ड डायमंड फसवणूक प्रकरण

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई :  सोन्याच्या दागिन्याच्या खरेदी-विक्रीच्या होलसेल व्यवसायाच्या बहाण्याने मुंबईतील सराफांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याच्या गुन्ह्यात अटकेत असलेल्या एस. कुमार ज्वेलर्स ॲन्ड डायमंड कंपनीचा मालक श्रीकुमार पिल्लई (६८) कडून जप्त केलेली रक्कम परत करण्यास पोलिसांना यश आले आहे. ११ जणांना तब्बल दोन कोटींची रक्कम परत करण्यात आल्यामुळे तक्रारदारांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. 

पिल्लईने मुंबईतील काळबादेवीतील सराफांशी  २०२० ते २०२१ मध्ये सोन्याच्या दागिन्याची खरेदी-विक्री होलसेल मध्ये व्यवसाय चालू होता. व्यवसायातून तक्रारदार व इतर व्यापाऱ्यांकडून सोन्याचे दागिने पिल्लईने घेतले होते. डिसेंबर २०२० पासून सोन्याचे दागिने (बांगड्या व इतर वस्तू) खरेदी करून सदर दागिन्यांचे पैसे परत देण्यास टाळाटाळ सुरू केली होती. तक्रारदार व सोने व्यापारी यांना ठरल्याप्रमाणे एकूण ४ कोटी २२ लाख ७४ हजार २७० रक्कम न देता पिल्लईने त्यांची फसवणूक केली.  त्यानंतर,   एस. कुमार ज्वेलर्स मालकाने भारतामध्ये विविध ठिकाणी असलेले १२ सोन्याची शोरूम अचानक बंद करून त्याने पळ काढल्याने तक्रारदार यांनी लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली.  

 २ कोटी ९ लाखांची रोकड ताब्यात एलटी मार्ग पोलिसांनी त्याला गेल्या महिन्यात अटक केली. अटकेच्या वृत्तानंतर विविध भागातील तक्रारदार पुढे येत आहे. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर परिसरात ३ ते ४ दिवस कुरीअर बॉय, डिलीव्हरी बॉय, फेरीवाले असे वेषांतर करून पिल्लईला भाड्याच्या घरातून शिताफीने बेड्या ठोकल्या. तसेच, त्याच्या बीएमडब्ल्यूसह त्यातील २ कोटी ९ लाखांची रोकडहे जप्त केली. फसवणूक केलेली रक्कम तक्रारदार यांना परत करण्यासाठी न्यायालयाकडून आदेश प्राप्त होताच, ११ तारखेला ११ तक्रारदारांना त्यांची रक्कम पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्या हस्ते परत करण्यात आले आहे.