शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वेश बदलून वेगवेगळ्या रिक्षाने पळालेले चोर अटकेत; चारकोप पोलिसांची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 07:20 IST

Crime News : रविकुमार सिंह आणि श्याम गुजर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मालवणीत जरीमरी कॉटेजमध्ये राहत असून, सिंह व्यवसायाने केटरर्स आहे.  गुजर हा बेरोजगार आहे.

मुंबई : ग्राहक बनून सोने-चांदीच्या दागिन्यांच्या दुकानात शिरत चोरी करणाऱ्या दुकलीला पोलिसांनी अटक केली आहे. चारकोप पोलिसांनी गुरुवारी ही कारवाई केली आहे. चोरीला गेलेली शंभर टक्के मालमत्ता पोलिसांनी हस्तगत केली आहे.रविकुमार सिंह आणि श्याम गुजर अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. हे दोघे मालवणीत जरीमरी कॉटेजमध्ये राहत असून, सिंह व्यवसायाने केटरर्स आहे.  गुजर हा बेरोजगार आहे. या दोघांनी चारकोपच्या सेक्टर ४ येथे पद्ममावती ज्वेलर्समध्ये लाखो रुपयांचे दागिने पळवून नेले. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, ते ग्राहक बनून दुकानात आले. दागिने चोरले.  नंबर प्लेट नसलेल्या पल्सर मोटरसायकलने पसार झाले. याबाबत तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर चारकोप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस मनोहर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे, सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे यांनी सीसीटीव्ही पडताळणी सुरू केली. आरोपी मालाडच्या सोमवार बाजार परिसरात दुचाकी सोडून वेश बदलत वेगवेगळ्या रिक्षांनी पसार झाल्याचे त्यांना दिसले. अधिक खंगाळणीमध्ये एक जण मालवणीच्या दिशेने जाताना त्यांना दिसला.त्यानुसार शिंदे यांचे पथक कॅथॉलिक चाळीकडे पोहोचले आणि दोन्ही आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून चोरीला गेलेले अडीच लाखांचे सोनेही हस्तगत करण्यात आले. एमएचबी परिसरात त्यांच्यावर गुन्हा दाखल असून, काशिमीरामधून चोरलेली मोटारसायकल त्यांनी दागिने चोरीसाठी वापरल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी