शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

क्लोन धनादेशाद्वारे गंडविणाऱ्यांच्या देशभरात अनेक टोळ्या; महाराष्ट्रापाठोपाठ गुजरातमध्येही पकडली टोळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2018 12:21 IST

क्लोन धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील सहा जणांंना गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अटक केली. अशा प्रकारे देशभरात अनेक टोळ्या बनावट धनादेशाद्वारे मोठ्या कंपन्यांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढत असल्याचे समोर आले.

ठळक मुद्देगुजरात, केरळ, आंध्र प्रदेशमध्येही बनावट धनादेशाद्वारे मोठ्या रकमा बनावट खात्यात वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे. 

औरंगाबाद : क्लोन धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय रॅकेटमधील सहा जणांंना गुन्हे शाखेने गेल्या आठवड्यात अटक केली. अशा प्रकारे देशभरात अनेक टोळ्या बनावट धनादेशाद्वारे मोठ्या कंपन्यांच्या खात्यातून परस्पर लाखो रुपये काढत असल्याचे समोर आले. या टोळ्याच्या म्होरक्याचा अद्याप शोध न लागल्याने या कारवाईची माहिती गुन्हे शाखेने राज्य गुन्हे अन्वेषण विभागाला (सीआयडी) कळविण्यात आली आहे.

बनावट धनादेशाद्वारे ठाणे जनता सहकारी बँकेतून (टीजेएसबी) ३ लाख ९३ हजार २९३ रुपये काढल्यानंतर अन्य एका बनावट धनादेशाद्वारे ४ लाख ८० हजार रुपये काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीला शहर गुन्हे शाखा पोलिसांनी मोठ्या शिताफीने मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातून २६ जून रोजी पकडले. आरोपी हरीश गोविंद गुंजाळ, मनीषकुमार जयराम मौर्या  ऊर्फ राकेश ऊर्फ मनीष यादव ऊर्फ अमित सिंग, मनदीपसिंग, रशीद खान, डबलू शेख आणि इसरार खान ही टोळी सध्या पोलीस कोठडीत आहे. गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत म्हणाले की, अटकेतील टोळी ही सिनेमास्टाईल काम करीत होती. यातील केवळ हरीश आणि इसरार हे परस्परांना ओळखतात. तसेच रशीद आणि इसरार खान हे एकमेकांचे नातेवाईक आहेत.

बनावट धनादेशाद्वारे फसवणूक करणाऱ्या रॅकेटचा गुन्हे शाखेने पर्दाफाश केल्यानंतर चार बँकांच्या तक्रारी आल्याची माहिती सावंत यांनी दिली. मात्र बँका फिर्याद नोंदविण्यासाठी पुढे येत नाहीत. सिडको पोलिसांना प्राप्त झालेल्या तक्रार अर्जात एका बँकेला साडेचार लाखाला गंडविण्याचा प्रयत्न झाला. आपल्या खात्यातील रक्कम काढण्यासाठी बँकेत एक धनादेश आल्याचा संदेश प्राप्त होताच त्या कंपनीने बँकेला फोन करून पेमेंट अदा न करण्याचे कळविल्याने खातेदाराची रक्कम सुरक्षित राहिली. कर्नाटक बँकेची दोन लाखाची आणि साऊथ इंडियन बँकेचीही फसवणूक झाल्याचे त्यांनी सांगितले.

गुजरात पोलिसांनी पकडली टोळीअशाच प्रकारे गुजरात राज्यातील मनीनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका बँकेतील ग्राहकाच्या खात्यातून ४ कोटी रुपये आदेश दत्ता ट्रेडिंग या बनावट कंपनीच्या खात्यात बनावट धनादेशाद्वारे वळते करण्यात आले होते. फेब्रुवारी महिन्यात झालेल्या या फसवणूकप्रकरणी गुजरात पोलिसांनी मुंबईतून पाच जणांना अटक केली. ती टोळी वेगळी होती. अशाच प्रकारे वर्धा आणि केरळ, आंध्र प्रदेशमध्येही बनावट धनादेशाद्वारे मोठ्या रकमा बनावट खात्यात वर्ग करण्यात आल्याचे समोर आले आहे.