शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हाच होईल रियाला अटक! पाटणा पोलिसांकडून सध्या केवळ चौकशी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 06:11 IST

सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : सुशांतसिंह राजपूत (३४) याच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीसह तिच्या कुटुंबाविरोधात पाटणा पोलिसात दखलपात्र गुन्हा (एफआयआर) दाखल केला आहे. मात्र सध्या पाटणा पोलीस तिची केवळ चौकशी करणार असून आरोप सिद्ध झाल्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुशांतची मैत्रीण असलेल्या रियाच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांचे पथक गेले तेव्हा ती घरी नव्हती. तिने वकिलांमार्फत सर्वोच्च न्यायालयाला या प्रकरणाची चौकशी मुंबई पोलिसांकडूनच व्हावी, अशी विनंती केली आहे. पाटणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियावर दखलपात्र गुन्हा दाखल करणारे सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी तिच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यातील तथ्य तपासून पाहण्याची जबाबदारी आमच्यावर आहे. मात्र रिया यासाठी सहकार्य करत नसल्याचे दिसत आहे. रिया निर्दोष असेल तर तिने तिची बाजू मांडणे गरजेचे आहे.दरम्यान, रिया आणि एफआयआरमध्ये नावे दाखल झालेल्या सर्वांना चौकशीसाठी नोटीस पाठवली जाईल. पाटणा पोलिसांनी आतापर्यंत तिघांचा जबाब नोंदविला असून त्यात सुुशांतची बहीण मितू, सुशांतचा वर्सोव्यात राहणारा नोकर आणि एका चार्टर्ड अकाउंटंटचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.कोटक महिंद्रा बँकेतील खात्याची चौकशीसुशांतच्या बँक खात्यातून १५ कोटी रुपयांची उलाढाल झाली. हे पैसे कोणत्या खात्यात पाठविण्यात आले? सुशांत यासाठी बँकेत आला होता का? याची चौकशी सुरू असून सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत आहे. सुशांतची बहीण मितूला सोबत घेऊन पाटणा पोलीस ही चौकशी करत आहेत.

मेंदूवर नियंत्रण कसे मिळवले?सुशांतच्या वडिलांनी गुन्हा दाखल केल्यानंतर पाटणा पोलिसांनी सर्व बाजूने तपास सुरू केला आहे. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे रियाने त्याच्या मेंदूवर नियंत्रण कसे मिळवले, नेमके काय केले की ज्यामुळे त्याने इतके टोकाचे पाऊल उचलले याचा खुलासा होणे अधिक गरजेचे आहे.- विकास सिंग,सुशांतच्या वडिलांचे वकील

रियाच्या सांगण्यावरून दिली औषधे?एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये सुशांतचा गेल्या पाच वर्षांपासूनचा जीम ट्रेनर तसेच जवळचा मित्र सामी अहमद याने खळबळजनक खुलासा केला आहे. रियाच्या सांगण्यावरून सुशांतला डिप्रेशनची औषधे दिली जात होती, असे त्याचे म्हणणे आहे. मात्र याला कोणताही अधिकृत दुजोरा अद्याप पोलिसांनी दिलेला नाही.

अंकिता लोखंडेचा जबाब नोंदविला - संजय सिंगच्सुशांतच्या मृत्युप्रकरणी त्याची माजी प्रेयसी अंकिता लोखंडे हिचा जबाब गुरुवारी पाटणा पोलिसांनी नोंदविला. जवळपास तासभर हे पथक तिच्या घरी होते.च्अंकितानेच सुशांत मृत्यूप्रकरणातील संशयित आरोपी रिया चक्रवर्तीचा पदार्फाश करत अत्यंत महत्त्वाचे पुरावे त्याच्या कुटुंबाला दिल्याचे समजते. त्यानंतर पाटणा पोलिसांनी त्याच्या वडिलांच्या तक्रारीनुसार याप्रकरणी दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली.च्पाटण्याचे डीआयजी संजय सिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला. हा जबाब या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत