शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

२० वर्षांनंतर चोरीचा ऐवज मिळाला परत; लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 00:48 IST

प्रवाशांना दिलासा

ठाणे : ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २० वर्षांपूर्वी चोरीस गेलेला सोन्याचा ऐवज शोधून तक्रारदाराला परत केला आहे. यासह बदललेला पत्ता शोधून अन्य दोघा तक्रारदारांनाही १० व १२ वर्षांनंतर ऐवज परत केला आहे.

सोनसाखळी चोरट्यांचा छडा लावून हस्तगत केलेला ऐवज मूळ मालकांना देण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आल्यानंतर ऐवज प्रदान करण्यात आला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी दिली. इतक्या वर्षांनंतर आपला चोरीला गेलेला ऐवज परत मिळाल्याने तक्रारदारांनी लोहमार्ग पोलिसांचे आभार मानले आहेत.

ठाण्यातील रुणवालनगर येथे राहणाऱ्या प्रिया तुपे यांची आठ ग्रॅम वजनाची सोनसाखळी २००० साली ठाणे रेल्वेस्थानक परिसरातून चोरीस गेली होती. याप्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांनी चोरीस गेलेला ऐवज हस्तगत केला. तसेच फिर्यादी प्रिया यांचा शोध घेऊन व न्यायालयाच्या परवानगीने त्यांचे वडील महेश तुपे यांना सोनसाखळी परत केली. वीस वर्षांपूर्वी चोरी झालेला ऐवज परत मिळाल्याने महेश तुपे यांनी पोलिसांचे आभार मानले. दुसºया घटनेत पुण्यातील अमृतसिंह राजवतसिंह गरेवाल यांची दोन तोळे वजनाची सोनसाखळी २०११ साली चोरीस गेली होती. या गुन्ह्याचाही छडा लावला. तक्रारदार यांचा पत्ता बदलल्याने ऐवज परत करणे शक्य होत नव्हते. पोलिसांनी मुंबई, ठाणे, पुणे येथे वर्षभर शोध घेतला. अखेरीस गरेवाल पुण्यात असल्याचे कळल्याने पोलिसांनी १० वर्षांनंतर त्यांचा ऐवज सुखरूप परत केला. ंतिसºया घटनेत आझादनगर येथील प्रवासी अमित कार्ले यांच्या ३२ ग्रॅम वजनाच्या तीन सोनसाखळ्या २००८ रोजी चोरट्यांनी लंपास केल्या होत्या. या गुन्ह्याचाही तपास करून लोहमार्ग पोलिसांनी १२ वर्षांनंतर कार्ले यांचा बदललेला पत्ता शोधून ऐवज परत केला. लोहमार्ग पोलीस आयुक्त रवींद्र सेनगावकर यांच्या फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्याच्या उपक्रमांतर्गत लॉकडाऊनच्या काळातही पोलिसांनी ऐवज परत केल्याने प्रवाशांनी आभार मानले.