शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

गायीला त्रास देणाऱ्याला हटकले म्हणून महिलेला दगड मारत जखमी केले !

By गौरी टेंबकर | Updated: January 29, 2024 16:30 IST

पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

मुंबई: गाईला त्रास देणाऱ्याला हटकलं म्हणून महिलेवर दगडफेक करण्याचा प्रकार सांताक्रुज परिसरात घडला. याप्रकरणी वाकोला पोलिसांनी अनोळखी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

तक्रारदार संजय यादव हे मालाडच्या मॉलमध्ये हाउसकीपिंगचे काम करतात. त्यांनी वाकोला पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, २८ जानेवारी रोजी उशिरा रात्री ते त्यांच्या घरात झोपले असताना त्यांचे तबेला चालक भाऊ इंदल यांच्या पत्नी मंजू यादव त्याठिकाणी आल्या. एक अनोळखी २५ वर्षाचा इसम त्यांच्या तबेल्यातील गायीच्या गुप्तांगाला हात लावत तिचा छळ करताना त्यांना दिसला. गाय वेदनेने ओरडत असल्यामुळे नेमके काय झाले हे यादव त्याठिकाणी पाहायला गेल्या.

तेव्हा त्यांना पाहून तो इसम गावदेवी बीट चौकीच्या दिशेने पळून गेला असे संजयना त्यांच्या वहिनीने सांगितले. त्याने जाताना खाली पडलेला दगड यादवच्या दिशेने भिरकावला. जो त्यांच्या डाव्या हाताला आदळून त्यांना मुका मार लागला. याप्रकरणी संजय यांनी वाकोला पोलिसात तक्रार दिल्यावर भारतीय दंड संहिता कलम ३२४ तसेच प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम ११(१)(ए) व ११(१)(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी