शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांना टीप दिल्याचा संशय, चिकन दुकानदारावर गावगुंडांचा गोळीबार

By पंकज पाटील | Updated: August 28, 2022 17:14 IST

बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान असून तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने आपल्या सहकाऱ्यांसह येत होता.

पंकज पाटील/अंबरनाथ

बदलापूर: बदलापुरात चिकनचे दुकान चालवणाऱ्या एका तरुणावर सहा ते सात जणांच्या गटाने जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्या तरुणावर गाव गुंडांनी गोळीबार देखील केला. मात्र या गोळीबारातून हा तरुण थोडक्यात बचावला. पोलिसांना टीप देत असल्याचा संशय मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याचे संबंधित तरुणाने स्पष्ट केले आहे.      बदलापूर गावातील कैफ शेख याचे गावातच चिकनचे दुकान असून तो शनिवारी रात्री बोराड पाड्यावरून बदलापूर गावाच्या दिशेने आपल्या सहकाऱ्यांसह येत होता. बदलापूर गावाच्या वेशीवरच दोन गाड्यांमधून आलेल्या अमन सिंग, सचिन खंडागळे, शेखर गडदे, पाठक बिल्डर, लक्ष्मण नवगिरे, रावत्या आणि इतर तीन ते चार जणांच्या गटाने कैफ याच्यावर तलवार आणि चॉपरने हल्ला चढवला. या हल्ल्यातून कैफ आणि त्याच्या इतर साथीदारांनी वाचण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी हल्लेखोरांपैकी एकाने कैफच्या दिशेने गोळीबार देखील केला. मात्र ही गोळी चुकल्याने त्याचा जीव थोडक्यात बचावला. याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन वर्षांपूर्वी हल्लेखोरांच्या काही साथीदारांना बेकायदेशीर बंदुकीसह पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याची टीप कैफ यांनी दिल्याचा संशय हल्लेखोर यांच्या मनात होता. त्याच संशयातून हल्लेखोरांनी कैफ याला मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी चार प्रमुख आरोपांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत