शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टरसमोर आला आडवा; म्हणे, 'आत्महत्या करतो!', टाकरखेडा संभू शिवारातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2022 15:18 IST

१९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास टाकरखेडा संभू शिवारात ही घटना घडली.

अमरावती: ट्रॅक्टरसमोर आडवे येऊन पेरणी करू देणार नाही, असे बजावत एकाने आत्महत्या करतो, असे पेरणी करण्यासाठी आलेल्यांना धमकावले. १९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठच्या सुमारास टाकरखेडा संभू शिवारात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी रविवारी दुपारी योगेश देशमुख (४२, टाकरखेडा संभू) यांच्या तक्रारीवरून आरोपी वामन गोविंद हंबर्डे (६५, टाकरखेडा संभू) याच्याविरूद्ध शेतात अतिक्रमण, शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा नोंदविला.

तक्रारीनुसार, योगेश देशमुख हे टाकरखेडा संभू येथील श्रीराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष आहेत. संस्थानच्या मालकीची टाकरखेडा शिवारात १०० एकर शेती आहे. पैकी ३० एकर शेतीच्या ताब्याचा मुद्दा न्यायालयात गेला होता. त्यावर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने त्या ३० एकर जमीनीचा ताबा संस्थानकडे दिला. त्यासाठी भातकुलीच्या तहसीलदाराला प्राधिकृत केले. तहसीलदारांनी ११ नोव्हेंबर २०२२ रोजी संस्थानला पोलीस संरक्षणात त्या शेतीचा ताबा देखील दिला.

अशी घडली घटना१९ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ च्या सुमारास देशमुख हे संस्थानच्या अन्य सदस्यांसह न्यायालयीन आदेशाने ताबा मिळालेल्या त्या शेतात हरभऱ्याची पेरणी करण्यास गेले. त्यावेळी वामन हंबर्डे हा त्या शेतात आला. ट्रॅक्टरसमोर आडवा येत पेरणी करू देणार नाही, असे म्हणून त्याने शिविगाळ केली. तथा आत्महत्या करण्याची धमकी दिली. तथा शेतात जबरदस्तीने शिरून पेरणी बंद पाडली. त्यामुळे देशमुख यांनी दुपारी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विजय गिते हे करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAmravatiअमरावती